महिंद्रा कंपनीने (Mahindra Cars) अलीकडे विविध प्रकारच्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. यातल्या काही गाड्यांना ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही गाड्यांना मात्र खूप कमी प्रतिसाद मिळतोय. यातल्याच एका एसयूव्ही कारकडे तर ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
Mahindra Car विक्रीमध्ये वाढ
महिंद्राच्या एसयूव्हीला देशात चांगली पसंती मिळत आहे. महिंद्रा कंपनीची प्रवासी कार विक्री नोव्हेंबर 2022 या महिन्यात 56 टक्क्यांनी वाढून 30 हजार 392 युनिट्स इतकी झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने 19 हजार 458 इतक्या मोटारींची विक्री केली होती.
महिंद्रा ही देशातील चौथ्या क्रमांकाची कार कंपनी आहे. महिंद्रा भारतात स्कॉर्पिओ ते महिंद्रा थार आणि XUV700 पर्यंतच्या कारची विक्री करत असते. ज्यांचा प्रतीक्षा कालावधी अनेक महिने असलेला दिसतो. मात्र कंपनीची एक एसयूव्ही देखील आहे जी ग्राहकांना अजिबात खरेदी करायची नाही, असे दिसून येत आहे.
ही आहे सर्वात स्वस्त SUV
ही कार म्हणजे Mahindra kuv100 nxt. ही महिंद्रा कंपनीची सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. या कारची किंमत 6.18 लाख रुपयांपासून सुरू होऊन 7.84 लाखांपर्यंत जाते. नोव्हेंबर महिन्यात महिंद्र KUV100 चे फक्त 2 युनिट्स विकले गेले आहेत. याधीच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये तर त्याचे एकही युनिट्स विकले गेले नव्हते.या कारचे इंजिन आणि वैशिष्ट्ये यावर नजर टाकूया. ही SUV K2+, K4+, K6+ आणि K8 या चार प्रकारांमध्ये विकली जात आहे. SUV ला 1198cc 3 सिलेंडर BS6 पेट्रोल इंजिन मिळते, जे 82bhp आणि 114Nm टॉर्क देते.यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. याला पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक मिळतो. चाकाचा आकार 15 इंच इतका आहे. वाहनाची बूट स्पेस 243 लीटर आहे.
या SUV मध्ये समोर 3 लोक बसू शकतात, हे याचे एक वैशिष्ट्य आहे. हे 5 सीटर (2+3) आणि 6 सीटर (3+3) पर्यायांमध्ये येते. तसेच, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर म्युझिक सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि USB कनेक्टिव्हिटी मिळते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            