Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop Year 2022-23 : गहू आणि तांदळाची किंमत कमी होईल! देशात विक्रमी धान्य उत्पादनाचा अंदाज

Crop Year 2022-23

Image Source : www.tbsnews.net

चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये देशाचे फूड प्रोडक्शन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पीक चांगले आल्यास त्याचा परिणाम नंतर पीठाच्या किंमतीवर (Wheat Aata Price) दिसून येईल आणि ते स्वस्त होऊ शकते.

चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये देशाचे फूड प्रॉडक्शन (Food Production) वाढण्याची शक्यता आहे. चालू पीक वर्षातील फूड प्रोडक्शन 32 कोटी 35.5 लाख टन विक्रमी उच्चांकापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. फूड प्रॉडक्शन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धान आणि गहूचे विक्रम उत्पादन. कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मंगळवारी याबाबत भाष्य केले. कृषी मंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, सरकारच्या धोरणांव्यतिरिक्त शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांच्या कठोर परिश्रमांमुळे रेकॉर्ड उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. यावर्षी गव्हाचे पीक चांगले असल्यास त्याचा परिणाम नंतर पीठाच्या किंमतीवर (Wheat Flour Price) दिसून येईल आणि ते स्वस्त होऊ शकते.

हा अंदाज का केला गेला आहे?

यावर्षी, गव्हाचे उत्पन्न रेकॉर्ड स्तरावर जाऊ शकते आणि त्यामागील कारण स्पष्ट आहे. यावर्षी, देशातील विक्रमी क्षेत्रात गहू पेरला गेला आहे, तर तज्ज्ञांनीही गव्हाच्या विक्रमी उत्पादनाची शक्यता व्यक्त केली आहे. यावर्षी, कृषी मंत्रालयाने भाकीत केल्यानुसार 11 कोटी टनांहून अधिक गहू तयार केला जाऊ शकतो. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी गव्हाची पेरणी 341.84 लाख हेक्टरमध्ये पेरण्यात आला. मात्र, उष्णतेच्या स्ट्रोकमुळे त्याच्या उत्पादनात घट नोंदवण्यात आली. याउलट, यावर्षी रेकॉर्ड पेरणीची अपेक्षित होती. जर आपण पेरणीच्या आकडेवारीकडे पाहिले तर यावेळी ते 343.23 लाख हेक्टर पर्यंत गेले आहे. देशातील सुमारे 1.39 लाख हेक्टर पेरणीचे क्षेत्र वाढले आहे.

पिठाची किंमत कमी होईल

गव्हाच्या बाबतीत, उच्च उत्पादनाचा अंदाज तसेच गव्हाची देशांतर्गत उपलब्धता वाढेल आणि गहू आणि आटा (गव्हाचे पीठ) च्या किरकोळ किमती खाली आणण्यास मदत होईल. किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारला गेल्या वर्षी मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालावी लागली होती. किरकोळ किमती कमी करण्यासाठी खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

तांदळाचे उत्पादनही वाढेल

सरकारच्या एका निवेदनात म्हटले आहे की, तांदळाचे उत्पादन 2022-23 या पीक वर्षात 13.08 कोटी टन होईल असा अंदाज आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 13.6 लाख टन जास्त आहे. चालू पीक वर्षात  धान्यांचे उत्पादन पाच कोटी 27.2 लाख टन आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत 16.2 लाख टन जास्त आहे. त्याच वेळी, 2022-23 मध्ये डाळींचे उत्पादन दोन कोटी 78.1 लाख टन होते, जे मागील वर्षी 2.73 कोटी टन होते.