Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card: आर्थिक व्यवहारांसाठी ग्राहक सर्वात जास्त 'या' 4 बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात

Credit card

Credit Card: अलीकडे आपण कॅशच्या (Cash) वापराऐवजी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणावर करू लागलो आहोत. सध्या देशातील 71 टक्के क्रेडिट कार्डचे व्यवहार चार बँकांच्या माध्यमातून केले जात आहेत. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

हल्ली कॅशचा वापर कमी झाला असून ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्याकडे सर्वांचा कल पाहायला मिळत आहे. ऑनलाईन पद्धतीत क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कार्ड्सवर बँकांकडून क्रेडिट लिमिट (Credit limit) देण्यात येते. ज्याच्या मदतीने लोकं आर्थिक व्यवहार करू शकतात. 'Bankbazaar' च्या क्रेडिट कार्डवरील एका अहवालानुसार  2023 च्या अखेरीस 10 कोटी क्रेडिट कार्डचा टप्पा ओलांडला जाऊ शकतो. एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर क्रेडिट कार्डचा वापर लोकांनी केल्याने क्रेडिट कार्डचा वापर विक्रमी उच्चांकावर पोहचला आहे.

सध्या एप्रिल महिन्यात 86 दशलक्ष क्रेडिट कार्डचे वापरकर्ते सक्रिय आहेत. मागील वर्षी हा आकडा 75 दशलक्ष इतका होता. ज्यामध्ये 15 दशलक्ष वापरकर्त्यांची वाढ झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय बाजारपेठेतील 71 टक्के क्रेडिट कार्ड व्यवहार हे केवळ 4 बँकांनी काबीज केले आहेत. तर उर्वरित 29 टक्के व्यवहार हे बाकीच्या बँकांच्या माध्यमातून केले जात आहेत. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

'या' चार बँकांच्या क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर

देशात मोठ्या प्रमाणावर आता क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. देशातील 71 टक्के क्रेडिट कार्ड व्यवहार हे एचडीएफसी बँक (HDFC Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India), अॅक्सिस बँक (Axis Bank)आणि आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank) क्रेडिट कार्ड द्वारे करण्यात येतात. तर उर्वरित 29 टक्के व्यवहार इतर खासगी किंवा सरकारी बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे केले जातात. देशात सर्वात जास्त एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्डचा वापर केला जातो.  

एचडीएफसी बँकेचे 1.78 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. एचडीएफसीच्या एका कार्डवर किमान 5,961 रुपयांचा सरासरी आर्थिक व्यवहार केला जातो. त्यापाठोपाठ एसबीआय बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिचे 1.68 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. या कार्ड्सवर सरासरी 5,275 रुपयांचा व्यवहार करण्यात आला आहे.

तिसऱ्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँकेचा नंबर लागतो. या बँकेचे 1.45 कोटी ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर करतात. ज्यावर सरासरी 4,545 रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आला आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर अॅक्सिस बँक असून तिचे 1.22 कोटी कार्डधारक आहेत आणि त्या क्रेडिट कार्डवर सरासरी 3,643 रुपयांचा व्यवहार करण्यात आला आहे.

क्रेडिट कार्डचा वापर का वाढला?

सध्या देशात मोठ्या प्रमाणावर क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. या कार्ड्सच्या माध्यमातून लोक घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग करू शकतात. ज्याची डिलिव्हरी घरपोच मिळते. प्रत्येक बँक आपल्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला क्रेडिट लिमिट (Credit limit) उपलब्ध करून देते. या क्रेडिट लिमिटचा वापर करून ग्राहक बँकेत पैसे नसताना देखील शॉपिंग करू शकतात. अडचणीच्या वेळी याच क्रेडिट लिमिटचा वापर करून तात्काळ पैशांची गरज पूर्ण करता येते. यासारख्या अनेक कारणांमुळे क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे.

Source: hindi.news18.com