Credit Card Reward Point: शॉपिंग किंवा कोणतेही ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी युपीआय आणि मोबाइल वॉलेटचा वापर वाढला आहे. मात्र, मोठ्या किंमतीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अद्यापही क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. त्याद्वारे तुम्ही रिवॉर्ड मिळवू शकता. हे रिवॉर्ड वापरून तुम्ही पुन्हा खरेदी करू शकता किंवा हॉटेल, फ्लाइट किंवा इतर कोणतेही तिकीट बुक करताना डिस्काऊंट मिळवू शकता. क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट साठवून तुम्ही तुमची आवडती शॉपिंग करू शकता. आहे की नाही कूल आयडिया.
तुम्ही जर क्रेडिट कार्डचा स्मार्ट पद्धतीने वापर केला तर तुमच्या खात्यात जास्त रिवॉर्ड पॉइंट जमा होतील. त्यासाठी तुमचे रेग्युलर पेमेंट क्रेडिट कार्डद्वारे करण्याची सवय लावा. फक्त शॉपिंग आणि काही ठराविक बिल पेमेंट क्रेडिट कार्डद्वारे करण्याबरोबरच तुम्ही महिन्याचे निश्चित न चुकणारे खर्चही क्रेडिट कार्डद्वारे करायला हवेत.
तुमचे मोबाइल वॉटेल क्रेडिट कार्डशी लिंक करा
तुमच्या युपीआयचे वॉलेट टॉप-अप करण्यासाठी नेट बँकिंग ऐवजी क्रेडिट कार्डचा वापर करा. त्याद्वारे तुम्हाला क्रेडिट कार्ड रिवॉर्ड तर मिळतीलच पण त्याचसोबत युपीआय पेमेंटवर कॅशबॅक देखील मिळेल. काही युपीआय वॉलेट फक्त बँक टू बँक पैसे ट्रान्सफर करू देतात. मात्र, ज्या युपीआयला क्रेडिट कार्डद्वारे टॉप-अप करता येतो त्यासाठी तुम्ही नक्की कार्ड वापरा.
घरभाडे क्रेडिट कार्डद्वारे भरा (Pay rent by credit card)
नोकरी व्यवसायासाठी अनेकजण मुंबई, बंगळुरू, दिल्लीसारख्या मोठ्या शहरात घर भाड्याने घेऊन राहतात. घरभाडे हा प्रत्येक महिन्याचा न टाळता येणारा खर्च असतो. मग तो कॅश, चेक, युपीआय किंवा डेबिट कार्डने पे का करावा? त्यावर थोडीच कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत. त्यामुळे रेंट देताना क्रेडिट कार्डचा वापर करा. मॅजिक ब्रिक्स, मायगेट, पेटीएम, नोब्रोकर, क्रेड, फोन पे अशा साइटद्वारे जर तुम्ही घरमालकाला रेंट दिले तर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतील. वर्षभरात क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरून तुम्ही जास्त रिवॉर्ड पाँइंट मिळवू शकता.
युटिलिटी बिल्स क्रेडिट कार्डद्वारे पेड करा
मोबाईल, इंटरनेट, टीव्ही रिचार्ज, सोसायटी मेंटेन्स, वीज, गॅस बील, ओटीटी अॅप सबस्क्रिप्शन बिल तुम्ही ऑटो डेबिट करू शकता. मुलांच्या शाळेचे शुल्क देखील तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे भरू शकता. जेवढे जास्त पेमेंट क्रेडिट कार्डद्वारे होतील तेवढे रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील.
विमा प्रिमियम आणि एनपीएस गुंतवणूक
आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स यांचे पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे ऑटो डेबिट करू शकता. क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही गुंतवणूक करू शकत नाही. मात्र, त्यास नॅशनल पेन्शन योजना अपवाद आहे. क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही एनपीएस चा प्रिमियम भरू शकता.
क्रेडिट कार्ड कंपन्या “रिवॉर्ड मल्टिप्लायर” ऑफर काही खास कारणांसाठी आणत असते. जसे की तुमचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, समर सेल, दिवाळी-दसरा सारखे सणांचे दिवस. या काळात तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केली तर पाचपट रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. त्यामुळे अशा ऑफर्सवर नजर ठेवा.
क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पाँइंटला एक्सपायरी डेट असते. त्यासाठी तुम्ही व्हॉउचर, कॅशबँक मिळवू शकता. किंवा हॉटेल, तिकिट बुकिंग किंवा इतर शॉपिंगसाठी हे रिवॉर्ड पॉइंट वापरू शकता. त्यामुळे हे पॉइंट एक्सपायर होण्याआधीच तुम्हाला फायदा मिळवून देतील.
तुमच्याकडे कोणते क्रेडिट कार्ड आहे?
सर्वसाधारण आणि प्रिमियम असे क्रेडिट कार्डचे प्रकार असतात. सर्वसाधारण कार्डच्या वापरानंतर जे रिवॉर्ड पॉइंट मिळतात त्यापेक्षा जास्त पॉइंट प्रिमियम कार्डवर मिळतात. मात्र, अशा कार्डची जॉइनिंग फी, शुल्क जास्त असते. मात्र, याद्वारे मिळणारे लाभही जास्त असतात. उदाहरणार्थ, प्रिमियम कार्डद्वारे शंभर रुपये खर्च केल्यास दोन रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. तेच सर्वसामान्य कार्डद्वारे पेमेंट केल्यास एकच रिवॉर्ड पॉइंट मिळतील.