By Pravin Barathe18 May, 2023 03:002 mins read 531 views
समर ट्रिपचं नियोजन आखत असाल तर तिकिट बुकिंग करताना क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉइंट वापरायला विसरू नका. सध्या अनेक क्रेडिट कार्ड तिकिट बुकिंगवर डिस्काउंट आहे. तसेच जर तुम्ही सतत प्रवास करत असाल तर ट्रॅव्हल क्रेडिट कार्डही घेऊ शकता. हॉटेल, रेल्वे, विमान, कॅब, रिसॉर्ट बुक करण्यासाठी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट कामाला येतील. किंवा प्लॅट डिस्काउंट ऑफरही मिळतील.
सध्या सुट्ट्यांचा सिझन सुरू आहे. उन्हाचा पारा वाढल्याने कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत ट्रिपचं नियोजन अनेकांच सुरू असेल. सुट्ट्यांमुळे विमान, रेल्वे, बस, ट्रॅव्हल अशा सर्वच ठिकाणी तिकीट अॅडव्हान्स्ड बुक असतात. तसेच हॉटेल, रिसॉर्टमधील गजबजही वाढलेली असते. अशा वेळेस बजेट ट्रिप करण्यासाठी तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून काही पैसे वाचवू शकता.
समर व्हॅकेशन सिझनमध्ये अनेक क्रेडिट, डेबिट कार्डवरुन विमान, बस, ट्रेन तिकीट, हॉटेल, रिसॉर्ट बुकिंगवर डिस्काउंट मिळवू शकता. तुमच्या क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंटने तुम्ही तिकीट बुकिंग किंवा शॉपिंगही करू शकता. त्यामुळे तुमच्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पाँइट वापरायला विसरू नका. तसेच क्रेडिट कार्डवर फ्लॅट डिस्काउंटही मिळत आहे. त्याचा फायदा घेऊ शकता.
ट्रॅव्हल प्लॅनर साइटवर ऑफर्स पाहा
मेक माय ट्रिप, ट्रिवागो, अगोडा यासारख्या ट्रॅव्हल प्लॅनर वेबसाइटवर तुम्हाला विविध ऑफर दिसतील. तुम्ही ट्रिपचे तिकीट बुक करण्याआधी या साइट जरुर चेक करा. तसेच विमान तिकीट बुकिंगवर एअरलाइन्सकडूनही डिस्काउंट दिला जातो. अधिक माहितीसाठी तुम्ही विमान कंपनीची साइट चेक करू शकता.