क्रेडिट कार्ड आपल्याला आर्थिक गरजेत कामी येत असतं. मात्र या क्रेडिट कार्डला मर्यादा असतात. तोवर आपण खर्च करू शकतो. मात्र कधी कधी आपला खर्च वाढतो आणि आपल्याला क्रेडिट कार्डच्या मर्यादेची अधिक गरज भासते. या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करता येवू शकतात. बँका (Bank) ही सुविधा आपल्या क्रेडिट कार्ड धारकाला उपलब्ध करून देत असते. यासाठी तुम्ही तुमच्या बँकेकडे अर्ज (Application) दाखल करू शकता. अर्ज प्राप्त झाल्यानंतर बँक सर्व बाबींची पडताळणी करते आणि मर्यादा (Limit) वाढवता येईल की नाही, हे तपासते.
Table of contents [Show]
मर्यादा वाढवण्याचे अनेक फायदे
क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याचे तसे तर अनेक फायदे आहेत. तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा जेव्हा जास्त असते, त्यावेळी तुमच्या अधिकाधिक गरजा त्यात कव्हर होत असतात. कोणत्याही कारणास्तव तुम्हाला पैशांची गरज लागली तर ती यातून पूर्ण होते. यात तुमच्या दैनंदिन गरजा, वैद्यकीय खर्च, मुलांची फीस यासोबतच इतर कोणत्याही कारणास्तव पैसे हवे असल्यास तुम्हाला बॅकअप मिळत असतो. यामुळे तुमची खरेदी शक्तीदेखील वाढत असते.
बँक तपासते सीयूआर
तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवायची असते, त्यावेळी बँक क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) पाहत असते. सीयूआर म्हणजेच तुमची क्रेडिट मर्यादा किती आहे तसंच तुम्ही किती खर्च केला. जर तुमचा सीयूआर कमी असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असतो. साधारणपणे 20-30 टक्के सीयूआर असेल तर ते चांगलं मानलं जातं. म्हणजेच तुमचा सीयूआर कमी असेल तर बँक तुम्हाला कमी जोखमीचा ग्राहक मानतात.
नियमित उत्पन्न असणाऱ्यांनाच बँकेकडून कर्ज
काहीजण आपल्या खर्चासाठी बहुतांशवेळा क्रेडिट कार्डवरच अवलंबून असतात. वारंवार क्रेडिट कार्डचा वापर केल्यास सीयूआर 70-80 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. याचा अर्थ तुम्ही मर्यादेच्या 80 टक्क्यांपर्यंत खर्च करत असता. बँकेलाही वाटते की तुमच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. या सर्वांचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर होत असतो. तर कर्ज मिळवण्यातही अडचणी निर्माण होत असतात. मात्र बँकेचेही नियम आहेत. बँका त्यांनाच कर्ज देतात, ज्यांच्याकडून वेळेवर ते फेडलं जाईल. म्हणजेच नियमित उत्पन्न असणाऱ्यांनाच बँक कर्ज देते.
...तर होईल अवाजवी खर्च
जास्त खर्च होत असणारी व्यक्ती आपल्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याचा विचार करू शकतो. मात्र त्यामुळे आणखी काही समस्या निर्माण होऊ शकतात. खरेदी शक्ती वाढल्यामुळे अवाजवी खर्च करण्यासही सुरुवात होऊ शकते. जेव्हा आपल्या बजेटची मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा निश्चितच त्याचा क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. ईएमआयचं ओझंही डोक्यावर येतं.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा पर्याय
जास्त खर्च केल्यास व्याजदेखील जास्तच व्याजाचा भारही वाढत जातो. त्यामुळे समस्या अधिक वाढण्याचीच शक्यता अधिक असते. खर्च जास्त होत असेल तर क्रेडिट कार्ड मर्यादा न वाढवता एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड ठेवण्याचा पर्यायदेखील वापरता येवू शकतो. यात तुम्हाला विविध वैशिष्ट्ये आणि ऑफरदेखील मिळता. मात्र कोणताही पर्याय स्वीकारण्याआधी त्यासंबंधीची माहिती असायला हवी. वेगवेगळ्या कार्डांवर वेगवेगळं वार्षिक शुल्क तुम्हाला भरावं लागतं. तसंच एकापेक्षा जास्त कार्ड असल्यानं पेमेंट मॅनेजमेंट किंवा क्रेडिट लिमिट लक्षात ठेवणंही कठीण होऊन बसतं.