Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank of India चे Debit Card वापरत असाल तर जाणून घ्या अपडेट, नाही तर कार्ड होऊ शकते बंद!

Bank of India

बँकेच्या सूचनेनुसार खातेदारांना त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या बँक शाखेला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करून घेता येणार आहे. अगदी कमी वेळात ही प्रक्रिया बँक कर्मचाऱ्यांद्वारे करून दिली जाणार आहे.

तुमचे जर बँक ऑफ इंडियात (Bank of India) खाते असेल आणि तुम्ही बँकेचे डेबिट कार्ड जर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार बँकेच्या सूचनांचे पालन न केल्यास ग्राहकांचे डेबिट कार्ड बंद होऊ शकते आणि ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 31 ऑक्टोबरनंतर डेबिट कार्ड वापरकर्त्यांना अशा अडचणींचा समाना करावा लागू शकतो.

बँकेने जारी केले निवेदन 

बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मिडियाद्वारे आणि लेखी निवेदनाद्वारे देशभरातील त्यांच्या खातेदारांसाठी एक निवेदन जारी केले आहे. यानुसार डेबिट कार्ड सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी बँक खात्याशी त्यांच्या वैध मोबाइल नंबर जोडणे अनिवार्य आहे. ज्या खातेदारांचा चालू मोबाईल क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसेल अशा खातेदारांचे डेबिट कार्ड निकामी करण्यात येईल आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीये.

31 ऑक्टोबरपर्यंत मुदत 

बँकेच्या सूचनेनुसार खातेदारांना त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी  31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या बँक शाखेला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करून घेता येणार आहे. अगदी कमी वेळात ही प्रक्रिया बँक कर्मचाऱ्यांद्वारे करून दिली जाणार आहे.

ऑनलाइन लिंक ऑप्शन उपलब्ध 

डिजिटल जमान्यात बहुतांश खातेदार डेबिट कार्ड वापरत आहेत. ज्या खातेदारांना स्वतःहून आपला मोबाईल क्रमांक लिंक करायचा असेल असे खातेदार एटीएमच्या माध्यमातून किंवा ऑनलाइन पद्धतीने लिंक करू शकता.

मोबाईल क्रमांक अपडेट नसेल तर अशा खातेदारांना त्यांचे डेबिट कार्ड 31 ऑक्टोबरनंतर वापरता येणार नाहीये. त्यामुळे भविष्यातील अडचणी कमी करायच्या असतील तर लवकरात लवकर बँक शाखेला भेट द्या आणि मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्या.