Christmas 2022: या वर्षातील शेवटचा सण आणि नवीन वर्षाच्या आगमनाला अगदी काही दिवसाचं उरले आहेत. अशातच अनेकांनी ख्रिसमस पार्टीच्या(Christmas Party) तयारीला सुरवात देखील केली आहे. लोकेशन स्पॉट, डेकोरेशन, वेगवेगळे खाद्यपदार्थ यांची नावं हल्ली व्हाट्स अँप ग्रुपवर(Whatsapp group) चॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. ख्रिसमसमध्ये एक मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे ‘Secret Santa चं’. याद्वारे बऱ्याच वेळा आपल्याला Secret Santa कडून गिफ्ट मिळतं तर कधी कधी आपण आपल्या प्रियजनांसाठी स्वतःच Secret Santa बनून त्यांना गुपचूप भेटवस्तू देतो.
दरवर्षी ‘Secret Santa’ बनून काय भेटवस्तु द्यायच्या? हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजचा हा लेख तुमच्यासाठी आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या प्रियजनांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक सुरक्षेची भेट देऊ शकता. यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत चला जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
आरोग्य विमा (Health insurance)
'आरोग्यम धन संपदा' असं आपल्याला लहानपणापासून शिकवलेले आहे. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच गंभीर आजार होतात. त्यामुळे एखाद्याला तुम्ही जर आरोग्या विमा भेट म्हणून देणार असाल तर आजच्या घडीला बाजारपेठेत कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत. हा विमा तुमच्या बजेटमध्येही असेल आणि या भेटवस्तूमुळे समोरच्या व्यक्तीला फायदा सुद्धा होईल.
गोल्ड इटीएफ (Gold ETF)
पूर्वीपासून आपण भेटवस्तु म्हणून सोनं(Gold) देतं आलो आहोत. आर्थिक अडचणीच्या काळात या सोन्याचा वापर करता येतो आणि ती अडचण सोडवता येते. मुलांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना सोन्याचे दागिने गिफ्ट देण्याऐवजी तुम्ही ‘गोल्ड इटीएफ’ किंवा ‘गोल्ड सेविंग फंड(Gold saving fund)’ या माध्यमातून तुम्ही त्यांना ही भेटवस्तू देऊ शकता.
फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit)
फिक्स्ड डिपॉजिट ही उत्तम आर्थिक भेटवस्तु ठरू शकते . ‘एफडी(FD)’मध्ये इतर बचत खात्यांपेक्षा अधिक व्याजदर(Interest) मिळतो त्यामुळे एखाद्याला भविष्यकाळात या निधीचा वापर करता येऊ शकतो.
म्युच्युअल फंड (Mutual funds)
मुलांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर उदा. शैक्षणिक खर्च, लग्नाचा खर्च यासाठी ही निधी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कामी येऊ शकते. त्यामुळे मुलांसाठी म्युच्युअल फंड हा एक सर्वोत्तम भेट देण्याचा पर्याय ठरू शकतो. ‘चिल्ड्रन गिफ्ट फंड’चे हायब्रीड व बॅलन्सड म्युच्युअल फंड(Mutual Fund) असे दोन प्रकार आहेत ते तुम्ही तज्ज्ञांशी बोलून समजून घेऊ शकता.