जागतिक स्तरावर ख्रिम्स्मस (Christmas 2022) हा सगळ्यात जास्त ठिकाणी साजरा होणारा सण. आणि त्यातच तो न्यू ईयरला (New Year) जोडून येतो . त्यामुळे जगभरात हा सुटीचा हंगामही समजला जातो. सुटीचा एक अर्थ पर्यटन (Tourism) असाही आहे. आणि त्यामुळे पर्यटन कंपन्या तसंच विमान कंपन्या (Airliners) या हंगामात सगळ्यात जास्त सक्रिय झाल्यात.
एमिरेट्स (Emirates) या विमान कंपनीने 25 डिसेंबर (25 December) या ख्रिस्मस (Christmas 2022) सणाच्या दिवशी एक व्हीडिओ आपल्या इन्स्न्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. आणि तो सध्या खूप जास्त व्हायरल होतोय. या व्हीडिओमध्ये एमिरेट्सचं एक विमान चक्क सांताक्लॉजची (Santa Claus) ढकलगाडी झालंय. आणि ही ढकलगाडी आकाशात खेचून नेतायत सांताक्लडजचे रेनडिअर (Reindeer)..!
या व्हीडिओतल्या एमिरेट्स विमानालाही सांताक्लॉजची टोपी चढवण्यात आलीय. विमान रनवे वर असताना त्याला रेनडिअर्स खेचून नेतात. आणि हे रेनडिअर उडूही शकतात. कारण, तेच विमानाला आपल्याबरोबर हवेत उंच उडवतात, असा हा व्हीडिओ आहे. एमिरेट्स कंपनी जगभरातले सगळे सण साजरे करण्यात आघाडीवर आहे. आणि प्रत्येक सणाला ते ऑफरही बाजारात आणतात.
ख्रिस्मसच्या दिवशी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या या व्हाडिओला आतापर्यंत 5,00,000च्या वर लाईक्स मिळालेत. आणि 1 कोटीच्या वर लोकांनी हा व्हीडिओ पाहिलाय. लोकांनी त्यावर कमेंट्सही भरपूर केल्या. यातल्या बऱ्याचशा प्रतिक्रिया या व्हीडिओतल्या सर्जनशीलतेला सलाम करणाऱ्या आहेत.
तर एमिरेट्सच्या एका नियमित प्रवाशाने म्हटलंय, ‘उडणाऱ्या रेनडिअरचं मला खूपच अप्रूप आहे. असा एकही हॉलिवूड चित्रपट मी सोडलेला नाही, ज्यात उडणारा रेनडिअर आहे. हा व्हीडिओ तर खूपच छान आहे.’ ‘हा व्हिडिओ अफाट आहे, आणि संकल्पनेला दाद द्यायला हवी,’ असं एकाने म्हटलंय. आणखी एकाने म्हटलंय, ‘सांता असाच तर पृथ्वीवर येतो!’