वर्ष 2022 चा शेवटचा महिना सुरु आहे.अनेकदा डिसेंबर महिना कंपन्यांसाठी शिल्लक मालाचा साठा संपवण्यासाठी महत्वाचा असतो.या महिन्यात सवलत देऊन ग्राहकांना आकर्षित केले जाते. सध्या हा ट्रेंड ऑटोमोबाइल क्षेत्रात दिसत आहे.कार उत्पादक कंपन्यांनी डिसेंबरमध्ये जुना स्टॉक संपवण्यासाठी बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे.जानेवारीपासून लागू होणाऱ्या दरवाढीपूर्वी बहुतेक कंपन्या कारच्या विविध मॉडेल्सवर सवलत दिली आहे.
Table of contents [Show]
मारुती-सुझुकीचा मेगा डिस्काउंट
मारुती सुझुकी या भारतातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने अल्टो, एस-प्रेसो, डिझायर, इको या कारवर डिस्काउंट जाहीर केला आहे. जानेवारीत किंमती वाढण्यापूर्वी ग्राहकांनी कार बुक करावी,असे आवाहन मारुती सुझुकीने केले आहे. याशिवाय कंपनीने सिएझ, बलेनो आणि इग्निस या कार मॉडेलवर देखील ऑफर दिली आहे. वॅगन-आरवर 57000 रुपयांचा डिस्काउंट असून अल्टो के-10 या कारवर 72000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
टाटा मोटर्सकडून 65000 रुपयांचा डिस्काउंट
टाटा मोटर्सने कॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बेनिफिट्सची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सकडून सफारी आणि हॅरियर या दोन एसयूव्ही मॉडेल्सवर 65000 रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. त्याशिवाय टिएगो आणि टिगोर या मॉडेल्सवर 35000 रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे.टाटा मोटर्सने जानेवारीपासून दरवाढीचे संकेत दिले आहेत.
महिंद्रांच्या मोटारीवर 1 लाखांची सवलत
महिंद्रा अॅंड महिंद्राकडून XUV 300 या मोटारीवर 1 लाख रुपयांची सवलत जाहीर केली आहे. त्याशिवाय बोलेरो आणि बोलेरो Neo या मोटारींवर 95000 रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. महिंद्रा थारच्या पेट्रोल मॉडेलवर 20000 रुपयांचा डिस्काउंट कंपनी देणार आहे.
ह्युंदाईकडून सवलत
ह्युंदाई कंपनीकडून ग्रॅंड आय-10 निओज या कारवर 63000 रुपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. तसेच ऑरा आणि i20 या कारवर देखील ग्राहकांना सवलत मिळणार आहे.
हिरो मोटोकॉर्प आणि टीव्हीएसच्या बाईक्सवर मिळतेय सवलत
दुचाकी निर्मात्या हिरो मोटोकॉर्प आणि टीव्हीएस मोटर कंपनी या कंपन्यांनी बाईक्सवर अनुक्रमे 3000 रुपये आणि 5500 रुपये डिस्काउंट जाहीर केला आहे.