बँकांच्या नफ्याचे आकडे पुढे आले आहेत. बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे. कॅनरा बँक, आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक यांनी चांगला नफा कमावला आहे. बँकांच्या या कामगिरीची कारणे काय आहेत ते देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. आयडीबीआय बँकेचा नफा 60 टक्क्याने वाढून 972 कोटी रुपये इतका झाला आहे. निव्वळ व्याज उत्पन्न 23 टक्क्याने वाढून 2 हजार 925 कोटी रुपये इतके झाले आहे. सकल NPA 21.68% वरून 13.82% वर आला आहे.
कॅनरा बँक
व्याज उत्पन्नात वाढ आणि बुडीत कर्जे म्हणजेच NPA कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कॅनरा बँकेचा नफा 92% ने वाढून 2 हजार 882 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एकूण उत्पन्न 26 हजार 218 कोटी रुपये तर व्याज उत्पन्न 22 हजार 231 कोटी रुपये होते. सकल NPA 7.80% वरून 5.89% पर्यंत कमी झाला आहे.
आयडीबीआय बँकेचा नफा 60% वाढून 972 कोटी रुपये इतका झाला आहे. निव्वळ व्याज उत्पन्न 23 टक्केने वाढून 2 हजार 925 कोटी रुपये झाले. सकल NPA 21.68% वरून 13.82% वर आला आहे.
अॅक्सिस बँकेला 5 हजार 853 कोटी रुपयांचा नफा
उच्च निव्वळ व्याज उत्पन्न आणि कमी एनपीए यामुळे अॅक्सिस बँकेचा नफा 62% वाढून 5 हजार 853 कोटी रुपयांवर पोचला आहे. एकूण उत्पन्न हे 21 हजार 101 कोटींवरून 26 हजार 982 कोटींवर पोहोचले आहे. निव्वळ व्याज उत्पन्न 32 टक्क्यांनी वाढून 11 हजार 459 कोटी रुपये इतके झाले आहे. ग्रॉस एनपीए 2.38 टक्के इतका राहिला आहे. या बँकांच्या व्याज उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर बुडीत कर्जे म्हणजेच NPA कमी झाल्यामुळे बँकांच्या नफ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे.