Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 Twitter Memes: नव्या आयकर प्रणालीमुळे नोकरदार खुश; ट्विटरवर मीम्सचा पाऊस

Budget 2023 Twitter Memes:

Budget 2023 Twitter Reaction: बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी नवीन कर प्रणाली जाहीर करण्यात आली. या नवीन कर प्रणालीवर अनेक गंमतीशीर मीम्स ट्विटरवर पाहायला मिळाले आहेत.

Budget 2023 Twitter Reaction: देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प(Union Budget 2023) बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अनेक घटकांसाठी मोठ्या घोषणा देखील जाहीर केल्या. वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्त्वाची आणि चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे 'नवीन आयकर प्रणाली(Income Tax)'. या नवीन आयकर प्रणालीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. लोकांना अपेक्षित असलेली तरतूद सरकारकडून नव्या कर रचनेच्या स्वरूपात करण्यात आली आहे. याच नव्या आयकर प्रणालीमुळे नोकरदार खुश असून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

नवीन आयकर प्रणाली बद्दल थोडंस

गेल्या अनेक वर्षांपासून कर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र यापुढे 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ असणार असून आयकरची मर्यादा ही सरसरट 7 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. 3 ते 6 लाख उत्पन्नावर यापुढे 5 टक्के कर द्यावा लागणार आहे. याशिवाय 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10 टक्के कर आकारला जाणार आहे. 9 ते 12 लाख ज्यांचे उत्पन्न असेल, त्यांना 15 टक्के कर भरावा लागणार आहे. तर 15 लाखांच्या वर ज्यांचे उत्पन्न असेल, त्यांना  30 टक्के कर भरावा लागणार आहे.

ट्विटरवरील भन्नाट मिम्स

नवीन टॅक्स स्लॅबबद्दल ट्विटर प्लॅटफॉर्मवर, वापरकर्ते मीम्सच्या माध्यमातून सरकारची खिल्लीही उडवत आहेत त्यासोबतच कौतुकही करत आहेत. ट्विटर युजर नवदीप यादव नावाच्या वापरकर्त्याने मध्यमवर्गीय 3 इडियट्स चित्रपटाची एक मीम शेअर केली, ज्यावर लिहिले आहे-  "नीचे से चेक कर... नीचे से."

तारक मेहता मधील जेठालालचा फोटो शेअर करत, फायनान्स मीम्स नावाच्या युजरने लिहिले – मी आयकराच्या घोषणेची वाट पाहत आहे. कृष्णा नावाच्या युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती ज्याच्या शरीरावर पट्टी गुंडाळलेली आहे, तो डान्स करत आहे. युजरने लिहिले आहे, माझ्या बँक खात्यात फक्त 575 रुपये आहेत आणि मला आयकर सवलत दिल्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे.