BMC Education Budget Highlights: मुंबई महानगरपालिकेने शनिवारी (दि. 4 फेब्रुवारी) शिक्षण विभागाचा 3,347 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 23 कोटी रुपयांची कपात केली. 2022च्या बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी 3,370 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
मुंबई महापालिकेमध्ये नियमानुसार, महापालिकेचे आयुक्त हे शिक्षण समितीच्या अध्यक्षांना बजेट सादर करतात. पण मुंबई महापालिकेची मुदत मार्च 2022 मध्ये संपली आहे. त्यामुळे सरकारने मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. सध्या मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal, Commissioner, BMC) हे प्रशासकाची भूमिकेमध्ये आहेत. महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत दुसऱ्यांदा महापालिकेचा अर्थसंकल्प प्रशासकाद्वारे मांडला जात आहे.
2020-21 मध्ये महापालिकेने प्रथमच स्टेट बोर्डाव्यतिरिक्त इतर बोर्डाच्या शाळा सुरू केल्या. या उपक्रमासाठी महापालिकेने आयबी बोर्डाच्या शाळेसोबत अॅफिलेशन करण्यासाठी 4.44 लाख फी भरली आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव अशी महापालिका आहे; जी वेगवेगळ्या बोर्डाअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देते. सध्या मुंबईत 14 मुंबई पब्लिक स्कूल (Mumbai Public Schools) सुरू असून, त्यात सीबीएससी बोर्डाच्या (CBSC Board)11 शाळा आणि आयसीएसई, आयबी आणि केंब्रिज बोर्डाच्या प्रत्येकी 1-1 शाळा सुरू आहेत.
शिक्षण विभागाच्या 2023-24 मधील अर्थसंकल्पीय अंदाज आणि 2022-23 चे सुधारित अंदाज
महापालिकेच्या शाळांची सद्यस्थिती
- मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड माध्यमांच्या शाळा सुरू
- 8 माध्यमांसाठी 965 प्रथामिक तर 249 माध्यमिक शाळा कार्यरत आहेत.
- महापालिकेच्यावतीने विशेष मुलांसाठी 18 स्पेशल स्कूल चालवले जातात.
- 2 अध्यापक विद्यालये आणि 3 ज्युनिअर कॉलेजस सुरू