Black Friday 2022 Sale अखेर आजपासून (दि.25 नोव्हेंबर) सुरू झाला. ब्लॅक फ्रायडे सेल (Black Friday Sale) ही संकल्पना मूळ अमेरिकेतील आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यातील चौथा शुक्रवार हा ब्लॅक फ्रायडे सेल (Black Friday Sale) म्हणून घोषित केला जातो. अमेरिकेतील हे कल्चर आता संपूर्ण जगभर पसरले असून, भारतातही Black Friday Saleचे लोण आले आहे. त्यामुळे भारतातील वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सनी या सेलनिमित्त मोठमोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. या सेलमध्य ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, कपडे, शूज, मोबाईल, गॅझेट्स आणि अशाप्रकारच्या बऱ्याच गोष्टी सवलतीत मिळणार आहेत. आपण भारतातील वेगवेगळ्या ब्रॅण्डसनी जाहीर केलेल्या डिस्काऊंटची माहिती घेणार आहोत.
Table of contents [Show]
क्रोमा (Croma)
टाटा ग्रुपमधील क्रोमा या आऊटलेटने Black Friday Sale 18 नोव्हेंबरपासूनच सुरू केला आहे. म्हणजे क्रोमा आऊटलेटने वेगवेगळ्या प्रोडक्टसवर भरमसाठी सवलत दिली आहे. आणि हा डिस्काऊंट सेल 18 ते 27 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे. क्रोमामध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना HDFC बॅंकेच्या क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांपर्यंत किंवा 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. तर 1 लाखाच्या खरेदीवर थेट 5 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.
या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ग्राहकांना iPhone 12 128 GBचा 51,990 रुपयांना मिळणार आहे. ज्याची मूळ किंमत 64,990 रुपये आहे. याबरोबरच स्मार्टफोन, घरगुती उपकरणे, फ्रीज, वॉशिंग मशीन या प्रोडक्टसवर भरघोस सूट देण्यात आली आहे.
ॲमेझॉन (Amazon)
जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या ॲमेझॉनने नेहमीप्रमाणे सर्वप्रकारच्या प्रोडक्टसवर भरपूर सूट दिली आहे. सिक्युरिटी कॅमेरा, कॅमेरा विथ डोअरबेल्स अशा प्रोडक्टसवर 56 टक्क्यांपर्यंत ऑफ आहे. तर नामांकित कंपनीच्या लॅपटॉप, डेस्कटॉप, मॉनिटरवर 34 टक्क्यांची सूट दिली आहे. ॲमेझॉनच्या साईटवर वेगवेगळ्या प्रोडक्टसची कॅटेगरी देण्यात आली असून, यातून तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू विकत घेऊ शकता. ॲमेझॉनचा हा सेल कालापासून सुरू झाला असून आज (दि. 25 नोव्हेंबर) रात्रीपर्यंत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.
आदिदास (Adidas)
शूजमधील नामांकित ब्रॅण्ड आदिदास कंपनीने ब्लॅक फ्रायडे 2022 निमित्त ग्राहकांना 40 ते 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर्स दिल्या आहेत. या सेलनिमित्त आदिदास कंपनीने वेगवेगळ्या प्रोमोकोडसुद्धा जाहीर केले आहेत. या प्रोमोकोडद्वारे ग्राहकांना खरेदीवर 15 टक्क्यांपासून 60 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. हा सेल फक्त आजच्या दिवसापुरता असणार आहे.
बोट (boat)
हेडफोन, स्पीकर्स, स्मार्टवॉच याची निर्मिती करणाऱ्या बोट या कंपनीने 4 दिवसांचा ब्लॅक फ्रायडे सेल जाहीर केला आहे. हा या सेलमध्ये म्युझिक लव्हर्सना 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. या सेलसाठी बोट कंपनीने एक्सल्यूसिव्ह कलेक्शन आणले आहे. ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स, रंग उपलब्ध आहेत आणि हा सेल 25 ते 28 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे.
शॉपर्स स्टॉप (Shoppers Stop)
शॉपर्स स्टॉप या ब्रॅण्डने ब्लॅक फ्रायडे सेलनिमित्त वेगवेगळ्या ब्रॅण्डसवर 30 टक्क्यांपासून 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. शॉपर्स स्टॉपचा हा सेल 23 नोव्हेंबरपासून सुरू झाला असून तो 27 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.या सेलमध्ये ग्राहक कूपन कोडचा वापर करून अधिक डिस्काऊंट मिळवू शकतात. तसेच ग्राहकांना 10 हजारांच्या खरेदीवर थेट 900 रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे.