• 07 Dec, 2022 08:54

Black Friday 2022 Sale : अमेरिकेतील सेलसाठी भारतातून शॉपिंग कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती!

Black Friday 2022 Sales

Black Friday 2022 Sales : अमेरिकेतून ब्लॅक फ्रायडे 2022 अंतर्गत काही प्रोडक्टस किंवा वस्तू खरेदी करताना त्याचा पॅकेजिंग आणि शिपिंग खर्च लक्षात घ्या. नाहीतर डिस्काऊंटमध्ये विकत घेतलेल्या वस्तूचा शिपिंग खर्च भारी पडू शकतो.

Black Friday 2022 Sale ला अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. मुळात ब्लॅक फ्रायडे सेल (Black Friday Sale) ही संकल्पना अमेरिकेतील आहे आणि अमेरिकेत हा नोव्हेंबर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी आयोजित केला जातो. 2022 मधील ब्लॅक फ्रायडे सेल उद्यापासून (दि.25 नोव्हेंबर) सुरू होत आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये मोठमोठ्या ब्रॅण्डसचे प्रोडक्ट अगदी स्वस्तात मिळण्याची शक्यता असते. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, कपडे आणि बऱ्याच गोष्टी यामध्ये सवलतीत उपलब्ध असतात. ब्लॅक फ्रायडे सेलची संकल्पना आता भारतातही सुरू होऊ लागली आहे. पण आपण या लेखामधून भारतातून अमेरिकेतील ब्लॅक फ्रायडे सेलमधून कशाप्रकारे वस्तू विकत घेऊ शकतो याची माहिती घेणार आहोत.

ब्लॅक फ्रायडे सेल काय आहे?

ब्लॅक फ्रायडे सेल हा अमेरिकेत ख्रिसमसपूर्वी खरेदीचा सिझन सुरू झाल्याचा संकेत देणारा सेल आहे. अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यातील चौथ्या शुक्रवारी ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होतो. या सेलमध्ये खरेदीदारांना अनेक ब्रॅण्डसवर भरघोस सूट मिळते. आणि या सेलमधून ऑनलाईन शॉपिंगद्वारे खरेदी करता येते. म्हणजे तुम्ही भारतात राहात आहात आणि तुम्हाला ब्लॅक फ्रायडे सेलमधून खरेदी करण्यासाठी अमेरिकेला जायची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन शॉपिंगद्वारे Black Friday Sale मधून खरेदी करू शकता.

ब्लॅक फ्रायडे सेल कधी आहे?

यावर्षी म्हणजे 2022 मध्ये ब्लॅक फ्रायडे सेल 25 नोव्हेंबर, 2022 रोजी असणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठी मागणी!

ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये स्पेसिफिक प्रॉडक्टस काही तासांमध्ये संपतात. खासकरून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. अमेरिकेतून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना जगभरातून मागणी असते आणि हे प्रोडक्टस तसे महाग असतात. पण या सेलमध्ये भरघोस सूट मिळत असल्यामुळे हे प्रोडक्टस काही तासांत विकले जातात. त्यामुळे प्रोडक्टस आवड-निवड निश्चित करून लगेच मागणी नोंदवली तरच तुम्हाला तुमच्या पसंतीचे प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकेल.

भारतातून ब्लॅक फ्रायडे 2022 सेलचा लाभ कसा मिळवायचा?

अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्या जगभरातील देशांमध्ये ऑनलाईन शॉपिंगची सेवा देतात. त्यामुळे अशा साईटवरून खरेदी करणे ग्राहकांना फायद्याचे ठरू शकते. फक्त काही विशिष्ट प्रकारचे प्रोडक्टस ठराविक देशांमध्येच उपलब्ध असतात. अशावेळी तुम्ही तुमच्या परिचयातील, ओळखीच्या किंवा मित्र- नातेवाईकांच्या मदतीने किंवा थर्ड-पार्टी शिपिंग सर्व्हिस कंपनीच्या मदतीने अमेरिकेतील प्रॉडक्टस खरेदी करून मागवू शकता. त्याची डिलेव्हरी तुम्हाला भारतात सहज मिळू शकते. भारतात अशा अनेक डिलेव्हरी सर्व्हिसेस उपलब्ध आहेत. 

शॉप आणि शिपिंग फी कॅल्क्युलेशन आवर्जून तपासा!

तुम्ही भारतात राहून अमेरिकेतील ब्लॅक फ्रायडे सेलमधून खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, प्रोडक्टची निवड केल्यानंतर त्याची शॉप आणि शिपिंग फी आवर्जून चेक करा. तुम्ही जेव्हा प्रोडक्टची निवड करता. त्यानंतर पत्त्यासाठी देश आणि इतर माहिती देता. तेव्हा त्या प्रॉडक्टचे वजन, त्याची शिपिंग कॉस्ट आणि एकूण ते प्रॉडक्ट तुम्हाला किती रुपयांना मिळेल याची माहिती देते.