• 07 Dec, 2022 08:10

Black Friday Deal's: खरेदीसाठीला सज्ज व्हा! ब्लॅक फ्रायडे येतोय

Black Friday Deals, Shopping Festival,

Black Friday Deal's:ब्लॅक फ्रायडे सेल दिवशी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. यंदा हा दिवस 25 नोव्हेंबर रोजी येत आहे. अमेरिकेतील सर्वात मोठा शॉपिंग इव्हेंट ब्लॅक फ्रायडे भारतात देखील यंदा आयोजित केला जाणार आहे.

ब्लॅक फ्रायडे सेल दिवशी अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. यंदा हा दिवस 25 नोव्हेंबर रोजी येत आहे. अमेरिकेतील सर्वात मोठा शॉपिंग इव्हेंट ब्लॅक फ्रायडे भारतात देखील यंदा आयोजित केला जाणार आहे. अमेरिकेत थँक्सगिव्हिंग डेनंतर पहिल्या शुक्रवारी ब्लॅक फ्रायडे येतो. यावर्षी ब्लॅक फ्रायडे (Black Friday) निमित्ताने अनेक ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, सौंदर्य उत्पादने, कपडे आणि बऱ्याच गोष्टींवर सूट देत आहेत. अॅमेझॉन, क्रोमा, पुमा, नायका यासारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म भारतात विशेष ऑफरसह या सेलसाठी सज्ज आहेत. ब्लॅक फ्रायडे दिवशी दोन्ही प्रकारे म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन सेल सुरू असतो.

नायका (Nykaa)

ब्युटी, वेलनेस आणि फॅशन प्रॉडक्ट्स सेलर नायकाने आपला खास पिंक फ्रायडे सेल सादर केला आहे. भारतात हा सेल 26 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत चालेल. हा ब्रँड ऑनलाइन उत्पादनांवर आणि सर्व नायका स्टोअरमध्ये 40 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. लॅक्मे, लोरियल आणि मेबेलीन सारख्या ब्युटी ब्रँड आणि स्मॅशबॉक्स, क्लिंक आणि मॅक सारख्या लक्स ब्रँडवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. त्याचप्रमाणे, विक्रीदरम्यान नायकाचा 3,844 रुपयांचा ब्युटी बॉक्स 1,499 रुपयांच्या कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.

अॅमेझॉन (Amazon) 

ब्लॅक फ्रायडे नंतर येणारा सोमवार हा ‘सायबर मंडे’ म्हणून साजरा केला जातो. याहीवर्षी ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन गॅजेट्स आणि गिझ्मॉसवर आकर्षक डील घेवून येत आहेत. चार्जिंग केससह अॅपल एअरपॉड्स 12,900 रुपयांमध्ये, 40 टक्के सवलतीत उपलब्ध असून पीट्रॉन बासबड्स इन-इयर ट्रू वायरलेस ब्लूटूथ 5.0 केवळ 899 रुपयांमध्ये 53 टक्के सवलतीत उपलब्ध आहे. इतर इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्सवर सुद्धा अॅमेझॉनवर एक्सक्लुझिव्ह डिस्काउंट उपलब्ध असणार आहे.

बॉडी शॉप (Body Shop) 

या ऑनलाइन शॉपिंग साईटवर ब्लॅक फ्रायडे निमित्ताने 27  ते 30 नोव्हेंबर दरम्यान निवडक जागतिक सौंदर्य ब्रँड्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट उपलब्ध होणार आहे.  त्याशिवाय बॉडी शॉपच्या गिफ्टवर देखील ग्राहकांना सवलत मिळणार आहे.

पुमा (Puma) 

ब्लॅक फ्रायडे निमित्ताने पुमावर सुद्धा ऑनलाइन खरेदीदारांना विविध वस्तू कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान हा सेल सुरु राहणार आहे. ब्लॅक फ्रायडे निमित्ताने 40 टक्क्यांच्या सूट सह आणखी 25 टक्क्यांची सूट विविध वस्तूंवर मिळणार आहे.