Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TCS कंपनीत 100 कोटींचा भरती घोटाळा; 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नारळ, काय आहे प्रकरण?

TCS Hiring fraud

टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसमध्ये (TCS Hiring Scam) नोकरभरती करताना घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा तब्बल 100 कोटींचा असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने या प्रकरणी मनुष्यबळ विभागातील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसेच भरतीचे कंत्राट दिलेल्या काही कंपन्यांवर बंदी घातल्याचीही माहिती समोर येत आहे.

TCS Hiring fraud: भारतातील सर्वात मोठी आयटी फर्म टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसमध्ये नोकरभरती करताना घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हा घोटाळा तब्बल 100 कोटींचा असल्याचे बोलले जात आहे. कंपनीने या प्रकरणी मनुष्यबळ विभागातील 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकले असून चौकशी सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करताना काही ठराविक कंपन्यांना प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे. 

ठराविक कंत्राटी कंपन्यांना प्राधान्य?

TCS सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी भरती करताना इतर कंपन्यांना कंत्राट दिले जाते. या कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने TCS साठी कर्मचारी पुरवठा केला जातो. या बदल्यात TCS कडून कंपन्यांना प्रति कर्मचारी पैसे मिळतात. (TCS Hiring Fraud) अनेक कंपन्या TCS सोबत मिळून भरती प्रक्रिया पार पाडतात. मात्र, TCS च्या मनुष्यबळ विभागाकडून काही ठराविक कंपन्यांना प्राधान्य देण्यात आले. यामध्ये पैशांचा व्यवहारही झाला असून ही रक्कम 100 कोटींच्या घरात असल्याचे पुढे येत आहे. आघाडीच्या माध्यमांनी यासंबंधी वृत्त दिले आहे.

मनुष्यबळ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई 

TCS कंपनीने मुख्य मनुष्यबळ अधिकारी ई. एस चक्रवर्ती यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. एका अज्ञान व्यक्तीने यासंबंधी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. काही ठराविक कंत्राटी कंपन्यांद्वारे कर्मचारी भरती करताना ई. सी. चक्रवर्ती मागील अनेक वर्षांपासून कमिशन घेत आहेत, असा आरोप अज्ञात तक्रारकर्त्याने केला आहे. चक्रवर्ती मागील 26 वर्षांपासून टीसीएस कंपनीमध्ये कार्यरत आहेत. मात्र, त्यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. इतरही मनुष्यबळ विभागातील चार वरिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

तीन कंत्राटी कंपन्यांवर बंदी

कर्मचारी भरती प्रक्रियेत घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर टीसीएसने तीन कंत्राटी कंपन्यांवर बंदी घातली आहे. तसेच टीसीएसचे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी अजित मेनन आणि इतर वरिष्ठ अधिकारी या तक्रारीचा अभ्यास करत आहेत.

टीसीएसने आरोप फेटाळले

दरम्यान कर्मचारी भरतीमध्ये टीसीएस कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच कंपनीचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नसल्याचेही म्हटले आहे. टीसीएसच्या नियमांचे काही कर्मचारी आणि कंत्राटी कंपन्यांनी उल्लंघन केल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे यास भरती प्रक्रियेतील घोटाळा म्हणणे चुकीचे ठरेल, असे टीसीएसने म्हटले आहे.