Bank Holidays in Feb 2023: बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. सध्या इंटरनेट बँकिंग(Internet Banking), मोबाईल बँकिंग(Mobile Banking) मुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होत आहेत. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढणे(Cash Withdrawal), डिमांड ड्राफ्ट(Demand Draft) इत्यादी कामांसाठी बँकेमध्ये अनेकांचे येणेजाणे असते. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात बँका किती दिवस सुट्टीवर आहेत हे जाणून घ्या.
फेब्रुवारी महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी असेल?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या(RBI) वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात बँकांना बऱ्याशाच सुट्ट्या आहेत. या संपूर्ण महिन्यात विविध राज्यांमध्ये एकूण 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात शनिवार आणि रविवार व्यतिरिक्त महाशिवरात्रीसारख्या सणांना बँका बंद असतील. अशा परिस्थितीत जर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये बँक हॉलिडेच्या दिवशी कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर तुम्ही नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे काम करू शकता. याशिवाय एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्ही UPI सुद्धा वापरू शकता. यासोबतच तुम्ही क्रेडिट, डेबिट कार्डही वापरू शकता.
फेब्रुवारी 2023 मध्ये 'या' दिवशी बँकांना असेल सुट्टी
- 5 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशातील बँका बंद राहतील)
- 11 फेब्रुवारी 2023 - दुसरा शनिवार (देशातील बँका बंद राहतील)
- 12 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशातील बँका बंद राहतील)
- 15 फेब्रुवारी 2023- Lui-Ngai-Ni (हैद्राबादमधील बँका बंद राहतील)
- 18 फेब्रुवारी 2023 - महाशिवरात्री (मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनौ, रायपूर, रांची, शिमला, तिरुअनंतपुरम येथील बँका बंद राहतील)
- 19 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशातील बँका बंद राहतील)
- 20 फेब्रुवारी 2023 - राज्य दिन (आयझॉलमध्ये बँका बंद राहतील)
- 21 फेब्रुवारी 2023- लोसर (गंगटोकमध्ये बँक बंद राहील)
- 25 फेब्रुवारी 2023 - तिसरा शनिवार (देशातील बँका बंद राहतील)
- 26 फेब्रुवारी 2023 - रविवार (देशातील बँका बंद राहतील)