Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank of Maharashtra: जाणून घ्या, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या डेबिट व क्रेडिट कार्ड व्यतिरिक्त इतर कार्डविषयी माहिती

Bank of Maharashtra Cards

Bank of Maharashtra Cards: शक्यतो, बहुतेक लोकांना बॅंकेचे डेबिट व क्रेडिट कार्ड हे दोनच कार्डविषयी माहिती असते. मात्र या दोन कार्डव्यतिरिक्तदेखील बॅंकेचे विविध कार्डदेखील असतात, बॅंक हे कार्ड व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना देते. असेच काही बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या कार्डविषयी जाणून घेवुयात.

Bank of Maharashtra Card List: महाराष्ट्रात सर्वात अग्रेसर बॅंक म्हणून बॅंक ऑफ महाराष्ट्राची (Bank of Maharashtra) ओळख आहे. या बॅंकेचे डेबिट (Debit Card)  व क्रेडिट कार्ड (Credit Card) व्यतिरिक्त इतर कार्डदेखील उपलब्ध असतात. ते कार्ड बॅंक व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना देते. या कार्डचे काही फायदेदेखील असतात. अशा विविध कार्डविषयी अधिक माहिती जाणून घेवुयात. 

स्टुडंट डीबीटी प्रीपेड-कार्डस् (Student DBT Prepaid-Cards)

स्टुडंट डीबीटी प्रीपेड कार्डस्चा उपयोग हा रक्कम असल्याच्या बदल्यात वस्तू खरेदी करण्यासाठी केला जातो. हे कार्ड बॅंकेने सध्या पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आणि नागपूर महानगरपालिकेच्या डीबीटी प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आले आहेत. 

रुपे क्लासिक कार्ड (RuPay Classic Card)

रुपे क्लासिक कार्ड हे सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. सेव्हिंग खाते असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे कार्ड दिले जाते. या कार्डव्दारे तुम्ही एटीएमधून पैसे काढू शकता, पेमेंट करू शकता, बॅंकेत शिल्लक असलेल्या रकमेवर व्यवहारदेखील करू शकता.

रुपे प्लॅटिनम कार्ड (RuPay Platinum Card)

ज्या ग्राहकाच्या खात्यात तिमाही सरासरी 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम असल्यास त्या ग्राहकांना रूपे प्लॅटिनम कार्ड दिले जाते. हे कार्ड बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये असेपर्यंत मोफत आहे. या कार्डचा उपयोग एटीएम, पीओएस व्यवहार आणि अन्य ऑनलाईन व्यवहारांसाठी करता येतो. 

किसान कार्ड (Kisan Card)

रुपे किसान कार्डव्दारे शेतकऱ्यांना विविध सुविधांचा लाभ मिळतो. तसेच हे कार्ड सर्व सर्वसाधारण एमकेसीसी खात्यांनादेखील मिळू शकते

मुद्रा कार्डस् (Mudra Cards)

मुद्रा कार्डस् ही वैयक्तिक स्वरूपाची डेबिट कार्डस् आहेत. हे कार्ड सर्व पात्र प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा (पीएमएमवाय) लाभ घेणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतात. 

व्हिसा क्लासिक कार्ड (Visa Classic Card)

व्हिसा क्लासिक कार्डव्दारे तुम्ही खात्यामध्ये शिल्लक असलेल्या रकमेच्या आधारे वेगवेगळ्या सुविधांचा एटीएम च्या मदतीने फायदा घेवू शकता. 

व्हिसा पर्पल कार्ड (Visa Purple Card)

सदरची कार्डस् महाबँक पर्पल सेव्हिंग खातेधारकांना प्रत्येक दिवशी कमाल व्यवहार मर्यादा अंतर्गत काही सुविधा देते. मात्र या सुविधेवर कोणत्याही प्रकारचा देखभाल खर्च घेत नाही तसेच किंवा एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादादेखील ठेवत नाही.