‘अवतार 2 - द वे ऑफ वॉटर’ (Avatar 2 - The Way Of Water) या जेम्स कॅमेरुन (James Cameroon) दिग्दर्शित सिनेमाने सलग दुसऱ्या विकएंडला जगभरात विक्रमी गल्ला (Box Office) जमवला आहे. एकट्या उत्तर अमेरिकेत रविवारच्या दिवशी सिनेमाची तिकीट विक्री (Box Office Collection) 5.6 कोटी अमेरिकन डॉलरची होती. आणि त्यामुळे हा सिनेमा नवीन वर्षातही पाहिला जाणार असा अंदाज व्यक्त होत आहे.
फक्त अमेरिकेचा अंदाज बघितला तरी पहिल्या दहा दिवसांत सिनेमाने 25.37 कोटी अमेरिकन डॉलर कमावले आहेत. आणि अवतारच्या पहिल्या सिनेमालाही त्यांनी मागे टाकलं आहे. अवतार 1 ने पहिल्या दहा दिवसांत 21.27 कोटी अमेरिकन डॉलरची कमाई केली होती. अवतार 1 हा सिनेमा 2009 मध्ये आला होता. आणि त्यानंतर 14 वर्षांनंतर सिनेमाची दुसरी आवृत्ती प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. आणि ती ही सुपरहीट ठरतेय.
जागतिक स्तरावर आढावा घेतला तर पहिल्या दहा दिवसांतच अवतार 2 सिनेमा 2022 चा तिसरा सगळ्यात मोठा सुपरहीट सिनेमा ठरला आहे. ‘टॉप गन मेव्हरिक,’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड डोमिनियन’ हे दोन सिनेमे सध्या अवतार पेक्षा मागे आहेत. पण, अवतारला मिळालेलं चांगलं ओपनिंग पाहता, हा सिनेमा वर्षं संपण्याच्या आतही 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या वर जाऊ शकतो असा ट्रेड पंडितांचा अंदाज आहे.
अमेरिकेतल्या काही प्रांतांमध्ये सध्या वादळ आलं आहे. तर तिथे थंडीही जोरदार आहे. असं असताना अवतार 2 ने बॉक्स ऑफिसवर केलेली कामगिरी कौतुकास्पद मानली जातेय.
अमेरिका आणि कॅनडातली बाजारपेठ लक्षात घेता शुक्रवार ते रविवार दरम्यान ज्या सिनेमांनी हल्ला जमवला त्या पाच चित्रपटांची यादी अशी आहे,
अवतार 2 - 5.6 कोटी अमेरिकन डॉलर
पस इन द बूट्स द लास्ट विश - 1.13 कोटी अमेरिकन डॉलर
व्हिटनी ह्यूस्टन - 53 लाख अमेरिकन डॉलर
बॅबिलॉन - 35 लाख अमेरिकन डॉलर
व्हायोलंट नाईट - 31 लाख अमेरिकन डॉलर