Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Avatar 2 : James Cameron च्या चित्रपटाकडून विश्वविक्रमी बॉक्सऑफिस कलेक्शन!

Avatar 2

Image Source : www.avatar.com

Avatar 2 Box Office Collection : अवतार 1 प्रमाणेच अवतार 2 सिनेमाही बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमवतोय. भारतात 16 डिसेंबरला प्रदर्शित झाल्या झाल्या अवतारने बॉलिवूड चित्रपटांनाही धोबीपछाड दिली आहे.

अवतार 1 (Avatar - 1) प्रदर्शित झाल्यानंतर 13 वर्षांनी अवतार 2 (Avatar 2) चित्रपट म्हणजे पहिल्याचा सिक्वेल (Sequel) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण, अवतारची जादू अजूनही तरुण आणि लहान प्रेक्षकांवर कायम आहे, असं म्हणावं लागेल. भारतीय सिनेमागृहांमध्ये अवतार 2 प्रगटला तो 16 डिसेंबरला. आणि पहिल्याच दिवशी त्याने चक्क 40 कोटींची कमाई (Box Office) केली आहे. याच कालावधीत जगभरातला गल्ला तब्बल 1,500 कोटी रुपयांचा आहे.     

भारतात 100 कोटींच्या क्लबमध्ये (100 Crore Club) जाण्यासाठी सिनेमाला फक्त दोन दिवस लागले. 17 डिसेंबरला शनिवारचा सुटीचा दिवस असल्यामुळे सिनेमाने जवळ जवळ 60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला . भारतात इतका तुफान धंदा करणारा हा दुसरा मोठा हॉलिवूटपट ठरला आहे.     

पहिल्याच दिवशी 40 कोटींची कमाई करणारे चित्रपट    

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 40 कोटींची कमाई करणारा या आधीचा चित्रपट होता 2019 साली आलेला अँव्हेंजर्स! अँव्हेंजर्स - एंडगेम या सिनेमाने पहिल्या दिवशी 53 कोटींचा गल्ला जमवला होता. आताचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर पहिल्या विकएंडला म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवारमध्ये अवतार 2 ची कमाई 130 कोटी रुपयांमध्ये जाईल असा ट्रेड पंडितांचा अंदाज आहे.    

जेम्स कॅमेरुन या हॉलिवूडमधल्या प्रथितयश दिग्दर्शकाने हा सिनेमा बनवलाय. आणि त्याचा पहिला भाग अवतार 1 देखील जगभरात सुपरहीट ठरला होता.     

अवतार 2 - द वे ऑफ वॉटर    

एखाद्या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल यायला दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी जातो, तेव्हा नवीन सिनेमाची उत्सुकता आणखी वाढते. तसंच अवतार 2 बद्दल झालं आहे, असं सिनेजगतातल्या लोकांना सध्या वाटतंय. जेक आणि नितिरी या दांपत्यांना दोन मुलं आहेत. आणि त्यांचा सुखाचा संसार सुरू असताना अचानक क्वारिच जमातीचे लोक एका विशिष्ट परिस्थितीत त्यांच्यावर हल्ला करतात, अशी सिनेमाची कथा आहे.     

सुली कुटुंबीय एकत्रपणे या संकटाला सामोरं जातात. आणि विजयी होतात. या सिनेमात कुटुंबातल्या चारही सदस्यांमधलं प्रेम आणि सलोखा दाखवला आहे. आणि ही गोष्ट जगभरातल्या प्रेक्षकांना आवडतेय, असं ट्रेड पंडितांचं म्हणणं आहे. भारतात हा सिनेमा ओरिजिनल इंग्रजीबरोबरच हिंदी, तामीळ, तेलुगू, कन्नडा आणि मल्याळम या भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.