Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Avatar 2 ची बॉक्स ऑफिसवर 1 अब्ज अमेरिकन डॉलरची कमाई 

Avatar 2

Image Source : www.koimoi.com

Avatar 2 ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड नवीन वर्षातही सुरूच आहे. आणि जेम्स कॅमेरुनच्या या सिनेमाने आतापर्यंत 1 अब्ज अमेरिकन डॉलरचा टप्पा गाठलाय. सगळ्यात कमी वेळेत हा टप्पा गाठण्याचा विक्रमही सिनेमाच्या नावावर लागू शकतो

अवतार 2 (Avatar 2 : The Way of Water) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच्या सलग तिसऱ्या आठवड्यात तुफान गल्ला (Box Office) जमवताना दिसतो आहे. या प्रवासात जेम्स कॅमेरुन (James Cameroon) दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे काही विक्रमही (Box Office Collection) मोडले आहेत. उत्तर अमेरिका खंडात काल संपलेल्या आठवड्यात या सिनेमाची कमाई होती 82.4 दशलक्ष अमेरिकन डॉलरची. आणि रविवारीच सिनेमाने 1 अब्ज अमेरिकन डॉलरचा पल्ला गाठलेला होता.  

आतापर्यंत या सिनेमाने अमेरिकेत 440.5 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा गल्ला जमवलाय . तर जगभरातला गल्ला आहे 957 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा. आतापर्यंतच्या इतिहासात फक्त सहा सिनेमांनी पहिल्या दोनच आठवड्यात 1 अब्ज अमेरिकन डॉलरच्या आसपास गल्ला जमवला आहे. त्यांनाही आता अवतार 2 ने मागे टाकलं आहे.   

पण, अवतार 2 या सायन्स फिक्शन सिनेमाचा निर्मितीचा खर्चही तुफान होता. दिग्दर्शक जेम्स कॅमेरुनने आताही फक्त 50% कमाई झाली असल्याचं म्हटलंय. म्हणजे खर्चच 2 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात होता हे उघड आहे. अवतारच्या पहिल्या सिनेमावरच 2.9 अब्ज रुपये खर्च झाले होते.  

इतर सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर पस इन बूट्स या अ‍ॅनिमेशनपटाने बॉक्स ऑफिसवर 22 दशलक्ष अमेरिकन डॉलर कमावले. डिस्नीच्या ब्लॅक पँथर सिनेमाने साडेसहा दशलक्ष अमेरिकन डॉलरचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या क्रमांकावर होता व्हिटनी ह्यूस्टर हा चरित्रपट. त्याची बॉक्स ऑफिस कमाई होती 5.4 दशलक्ष अमेरिकन डॉलरची. बॅबिलॉन सिनेमाची जादूही बॉक्स ऑफिसवर अजून टिकून आहे. या व्यतिरिक्त हॉलिवूडचे इतर गाजलेले सिनेमे पुढील प्रमाणे,   

व्हायलंट नाईट (2.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर) 

द व्हेल (1.8 दशलक्ष अमेरिकन डॉलर) 

द फेबलमन्स (1.6 दशलक्ष अमेरिकन डॉलर) 

द मेन्यू (1.4 दशलक्ष अमेरिकन डॉलर) 

स्ट्रेंज वर्ल्ड (7.4 लाख अमेरिकन डॉलर)