Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMAY-G: घर बनवण्यासाठी मोबाईल वरून करा अर्ज, सरकार देईल सब्सिडीवर कर्ज!

PMAY-G

PMAY-G: जर तुमचे ही वार्षिक उत्पन्न 6 लाखाहून कमी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सहभागी होऊ शकता

PMAY-G: पीएम आवास योजना ग्रामीण(PMAY-G ) अंतर्गत कमी उत्पन्न गटातील(Low Income citizen)लोकांना घर बनवून देण्यासाठी अनुदानावर कर्ज(subsidized loan)उपलब्ध करून दिले जाते. पीएमएवायजी (PMAYG)योजनेतील अटीनुसार जर तुमचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यत असेल तर 6 लाख रुपयांच्या कर्जावर 6.5 टक्क्यांपर्यतची क्रेडिट लिंक्ड सबसिडी(Credit linked subsidy)तुम्हाला मिळणार आहे. यासाठी कर्जाचा कमाल कालावधी 20 वर्षांचा असेल. जर तुम्हाला घर उभारण्यासाठी (Home)जास्त रकमेची गरज असेल तर तुम्हाला त्या अतिरिक्त रकमेवर नेहमीचे व्याज द्यावे लागणार आहे. सरकारच्या या योजनेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अशा पद्धतीने करा अर्ज

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण(PMAY-G )  अंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने अँप(App) बनवले असून तुम्ही मोबाईलवर सुद्धा हे अँप ओपन करू शकता. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून(Google Play Store) हे अँप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरच्या मदतीने यामध्ये लॉग-इन(Play Store) आयडी बनवावा लागेल. त्यांनतर हे अँप तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी(OTP) पाठवेल. ज्याच्या मदतीने तुम्ही लॉगिन करून आवश्यक ती माहिती भरा. पीएमएवाय-जी(PMAY-G ) अंतर्गत घर मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थींची निवड करून अंतिम यादी वेबसाईटवर(Website) प्रकाशित करते.

PMAY ग्रामीण लिस्टमध्ये नाव कसे चेक करावे?

सर्वात आधी  rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx या वेबसाईटवर जाऊन नोंदणी नंबर(Registration Number) असेल तर तो टाका आणि क्लिक करा. यानंतर सर्व माहिती समोर दिसेल. जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर अॅडव्हान्स सर्च वर जाऊन क्लिक करा. यानंतर जो फॉर्म येईल त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरा. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करून जर तुमचे नाव पीएमएवाय-जी यादीत समाविष्ट असेल तर त्यासंदर्भातील माहिती त्याठिकाणी पाहायला मिळेल.

पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण योजना

पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण(PMAY-G )  ही भारत सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक असून याचे उद्दिष्ट सर्वांना घरे उपलब्ध करून देणे हे आहे. पीएम आवास योजनेमुळे अनेकांना घर बांधण्यासाठी आर्थिक लाभ(Financial Help) मिळाला आहे ज्यामुळे त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोरोना महामारीनंतर अनेक बॅंकांनी त्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरात(Home Loan Interest) कपात केली आहे. सध्या रियल इस्टेटमध्ये सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी सध्याची परिस्थिती अनूकूल आहे.