Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्वस्तात घर हवंय, PMAY अंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीत नोंदणी करा

स्वस्तात घर हवंय, PMAY अंतर्गत  सुरक्षा स्मार्ट सिटीत नोंदणी करा

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana - PMAY) योजनेतील शिरढोण, पालघर आणि कोकण मंडळातील विरार येथील 1200 घरांची जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Awas Yojana - PMAY) म्हाडाने वसई येथे सुरक्षा स्मार्ट सिटी या खाजगी सहकारी भागीदारी (PPP) तत्त्वावर आधारित निवासी प्रकल्प नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. या प्रकल्पात अत्यल्प गटासाठी 45,172 तर अल्प उत्पन्न गटासाठी  30,829 सदनिका उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून शिरढोण, पालघर येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांसह कोकण मंडळाच्या विरार येथील 1200 घरांची सोडत जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे.

विरार येथील 1200 घरांची सोडत 

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या माध्यमातून पीएमएवाय (PMAY) योजनेतील शिरढोण, पालघर येथील आणि कोकण मंडळातील विरार येथील 1200 घरांची जूनमध्ये जाहिरात काढण्यात येणार आहे. कोकण मंडळाच्या माध्यमातून 44 हजार घरांची उभारणी असून बहुतांश प्रकल्पात गृहखरेदीदारांना डायरेक्ट क्रेडिट लिंक सबसिडी योजना (credit linked subsidy scheme) देण्यात येणार आहे. पीएमवाय  योजनेसह कोकण मंडळांतर्गत वसई, विरार, मीरा-भाईंदर, ठाणे येथील घरांचाही समावेश असेल. म्हाडाने जून महिन्यात जाहिरात आणि त्यानंतर जुलै महिन्यात सोडत काढण्याचे नियोजन केले आहे.

सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प काय आहे? SURAKSHA SMART CITY PROJECT?

केंद्राच्या पंतप्रधान आवास योजनेची राज्यात अंमलबजावणी करताना म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार वसई-विरार शहर महानगरपालिके अंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटी  प्रकल्पाची नोंदणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पीएमएवाय (PMAY) योजनेअंतर्गत 2.5 एफएसआय देण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 75 हजार 981 सदनिका उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी 45,171 अत्यल्प उत्पन्न गटासाठी तर 30,829 अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. यापैकी म्हाडासाठी 27 हजार अत्यल्प व 17 हजार अल्प उत्पन्न गटातील घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तर विकासकाला 18,172 अत्यल्प व 13,829 अल्प उत्पन्न गटातील घरे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. म्हाडा अंतर्गत घरांसाठी 22 लाख 50 हजार रुपये रक्कम ठरविण्यात आली असून अत्यल्प उत्पन्न गटाच्या तरतुदीनुसार 2.5 लाख अनुदान मिळणार आहे. तर 1 हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पअंतर्गत वसईत अत्यल्प उत्पन्न गटातील घराची किंमत 19 लाख 99 हजार 999 रुपये असणार आहे.

सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प कुठे आहे 

म्हाडा ने ठरवून देण्यात आलेल्या घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत कमी असून परवडणाऱ्या दरातील आहे. या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा प्रकल्प वसई रेल्वे स्थानकापासून 1.4 किमी अंतरावर असून नायगाव तसेच राज्य महामार्ग 48 (एमएच 48) पासून मध्यवर्ती ठिकाणावर आहे. 

सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्प नोंदणी 

  • सुरक्षा स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी  http://surakshasmartcity.com/ या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. 
  • नोंदणी केल्यानंतर ‘लॉटरीसाठी अर्ज करा’ असे म्हटले आहे, त्यावर क्लिक करा. 
  • तिथे रजिस्टर, लॉटरी अ‍ॅप्लिकेशन, पेमेंट अशा स्टेप दिसतील. त्यानुसार फॉर्म भरा. 
  • लॉटरी अ‍ॅप्लिकेशनमध्ये कोणत्या उत्पन्न गटासाठी आपण अर्ज करतोय याची माहिती भरायची. 
  • नोंदणीच्या वेळेस 5,750 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. 
  • ग्राहकांच्या कागतपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच सोडतीच्या माध्यमातून घरांचा ताबा दिला जाणार आहे.