Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Layoffs: Amazon मध्ये 18 हजार कर्मचारी कपात, 6% इतके मोठे प्रमाण

Amazon Layoffs

Image Source : www.nytimes.com

Amazon layoffs news : कंपनीने गेल्यावर्षी दिलेल्या कल्पनेप्रमाणे मोठी कर्मचारी कपात होणार आहे. हजारो कर्मचाऱ्याना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.

आयटी दिग्गज कंपनी Amazon ला 18 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात करायची आहे.  खर्च कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मागच्याच वर्षी याबाबत सूचित करण्यात आले होते. आता लवकरच त्याची अमलबजावणी केली जाणार आहे.  

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी (Amazon CEO Andy Jassey)  यांनी कर्मचाऱ्यांना याची कल्पना दिली आहे. 18 जानेवारीपासून संबंधित कर्मचाऱ्यांना  सूचित केले जाणार आहे.  

ही कपात मोठ्या प्रमाणावर होत आहे.  सध्या फर्ममध्ये सुमारे 3 लाख इतके कर्मचारी आहेत. यामधून 18 हजार म्हणजे एकूण कॉर्पोरेट कर्मचार्‍यांपैकी 6% इतकी मोठी ही संख्या आहे.

Amazon ही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात  सुरू करणारी नवीनतम मोठी IT कंपनी आहे. यातून कंपनीने  आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. खर्च कमी करण्याच्या आवश्यकतेतून  कंपनीलाही कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. 

तंत्रज्ञान क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने गेल्या वर्षी याविषयी संकेत दिले होते.  आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याचे सांगितले होते. यामुळे 18 हजार जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.  

Amazon layoffs विषयी भूमिका केली स्पष्ट 

Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसी (Amazon CEO Andy Jassey) यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.  जेसी म्हणाले, "आम्ही संबंधित कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी काम करत आहोत. आणि एक पॅकेज प्रदान करत आहोत ज्यात सेपरेशन   पेमेंट, संक्रमणकालीन आरोग्य विमा लाभ आणि नोकरी प्लेसमेंट सपोर्ट, यासारख्या बाबींचा समावेश आहे." ते याविषयी पुढेम्हणाले, "अॅमेझॉनने भूतकाळात अनिश्चित आणि कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना केला आहे आणि आम्ही तो यापुढेही करत राहू.

सीईओ जेसी यांनी  संबंधित कामगार कुठले आहेत हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.  मात्र कंपनी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युरोपमधील संस्थांशी संवाद साधेल असे  Amazon CEO Andy Jassey म्हणाले आहेत.  जेसी यांनी याविषयी काही आणखी माहितीही दिली आहे. त्यांनी असेही सांगितले की बहुतांश कर्मचारी कपात अॅमेझॉन स्टोअर ऑपरेशन्स आणि त्यातील कर्मचारी, टेक्निकल टीम यामधील असतील.

अर्थव्यवस्थेसमोर आव्हान (world economy)

सध्या जागतिक अर्थव्यवस्था (uncertain economy) आव्हानांचा सामना करत आहे.   कंपन्या आपल्या खर्चात कपात करण्याचा निर्णय घेत आहेत. यातून कंपनीने (Amazon to layoff over 18,000 employees) हा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही अनेक कंपन्यांनी असा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना खर्चात कपात करण्याचे कारण वेळोवेळी पुढे आले आहे.