• 08 Jun, 2023 00:48

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Day sale सुरू होतोय शॉपिंग लिस्ट तयार ठेवा!

Amazon and Flipkart Sale 2022

Amazon Great Indian Festival, Flipkart Big Billion Days sale: तुमच्या आवडीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी शॉपिंग लिस्ट तयार ठेवा. Amazon आणि Flipkart वरील डील्स आणि ऑफर्स पुन्हा एकदा चेक करा.

Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days sale आज रात्री (दि.22 सप्टेंबर) 12 वाजल्यापासून सेल सुरू होतोय. पण जे Amazonचे प्राईम मेंबर्स आणि Flipkartचे प्लस सबस्क्राईब यांच्यासाठी हा सेल गुरूवारपासूनच सुरू झालाय. फ्लिपकार्ट बिग बिलिअन डे सेल हा आठवडाभर तर ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल महिनाभर सुरू राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही सेलमधून ग्राहकांना मोठमोठ्या कंपन्यांच्या स्मार्टफोनपासून लॅपटॉप, टीव्ही आणि गृहोपयोगी वस्तूंवर भरघोस सवलती मिळणार आहेत.

ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल टॉप डील्स

ॲमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल हा गुरूवारपासून सुरू झाला आहे. या सेलमधून मिळणाऱ्या टॉप डील्स आणि सवलती तुम्ही इथे पाहू शकता. नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स, लॅपटॉप, गेमिंग ॲक्सेसरीज आणि अलेक्सासारख्या वस्तुंवर खूपसाऱ्या सवलती मिळणार आहेत. सॅमसंग गॅलक्सी S 22 हा फोन 49,999 रुपये तर सॅमसंग गॅलक्सी M13 हा फोन 8,499 रुपयांना उपलब्ध असणार आहे. अपल कंपनीचा iPhone 12 हा 39,999 रुपये, Redmi 9 Activ हा फोन 7,499 रुपये, तर OnePlus Nord 2 CE Lite 5G हा फोन 16,999 रुपयांना मिळेल.

जर तुम्ही Alexa किंवा Fire TV  विकत घेणार असाल तर तुम्हाला काही निवडक प्रोडक्टसवर 500 रुपयांची सवलत मिळणार आहे. तसेच जर तुम्ही SMART AC, SMART TV विकत घेणार असाल तर तुम्हाला त्या प्रोडक्टसच्या खरेदीवर थर्ड जनरेशनचा Echo Dot हा फक्त 1,499 रुपयांना विकत मिळेल. ज्याची मूळ किंमत 4,499 रुपये आहे.

Amazon Great Indian Festival 2022
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची शेवटची तारीख अजून कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही. साधारणत: हा सेल महिनाभर चालतो. यावर्षी दिवाळी 24 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते.

फ्लिपकार्ट बिग बिलिअन डे सेलच्या टॉप डील्स

Flipkart Big Billion Days Sale रेग्युलर ग्राहकांसाठी 23 सप्टेंबरपासून सुरू होणार असून तो 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पण Flipkart Plus Membersसाठी हा सेल गुरूवारी (दि. 22 सप्टेंबर) रात्रीपासून सुरू होणार आहे.

बिग बिलिअन सेलमध्ये फेमस कंपन्यांचे स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि वेगवेगळ्या गॅझेटवर भरमसाठ सवलत दिली जाणार आहे. या सर्वांमध्ये iPhone 13 हा सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 128GB मेमपी असलेला हा फोन या सेलमध्ये 54,990 रुपयांना उपलब्ध असणार आहे. तर सॅमसंग गॅलक्सी F23 5G हा फोन 10,999 रुपयांपासून उपलब्ध असणार आहे. तर Samsung Galaxy S22+ या सिरीजमधील फोनच्या किमती 59,999 रुपयांपासून सुरू होणार आहे. मुळात याची MRP 1.02 लाखांपासून सुरू आहे.

Flipkart Big Billion Days Sale 2022
वर नमूद केल्याप्रमाणे नियमित ग्राहकांसाठी Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days Sale हा 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पण तुम्ही जर Amazonचे प्राईम मेंबर्स आहात किंवा Flipkart चे प्लस सबस्क्राईबर असाल तर तुमच्यासाठी हा सेल सुरू झाला आहे.