• 04 Oct, 2022 00:23

Amazon Great Indian Festival : 23 सप्टेंबरपासून ॲमेझॉन फेस्टिव्हल सुरू; प्रत्येक प्रॉडक्टवर मिळवा ऑफर्स

Amazon Great Indian Festival 2022

Amazon Great Indian Festival 2022 : भारतातील सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनचा 2022 मधील ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 ची घोषणा केली आहे. या महिन्याच्या 23 तारखेपासून (दि. 23 सप्टेंबर) हा फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे.

Amazon Great Indian Festival 2022 : भारतातील सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनचा 2022 मधील ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2022 ची घोषणा केली आहे. या महिन्याच्या 23 तारखेपासून (दि. 23 सप्टेंबर) हा फेस्टिव्हल सेल सुरू होणार आहे. या फेस्टिव्हल सेलद्वारे ग्राहकांना स्मार्टफोन, ग्राहकोपयोगी वस्तू, महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सवलतीसह मिळणार आहेत. तसेच एसबीआय कार्डधारकांना (SBI Card Holder) या सेलमध्ये 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट (Instant Discount) मिळणार आहे.


ॲमेझॉनने फ्लिपकार्टच्या सेलच्या घोषणेनंतर भारतातील ग्राहकांसाठी Amazon Great Indian Festival 2022 घोषणा केली. ग्राहकांसाठी खरंतर ही एक पर्वणी आहे. एकाचवेळी दोन मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना खरेदीचा सेल जाहीर केला. फ्लिपकार्टने ‘बिग बिलियन डे 2022 सेल’ (Big Billion Days 2022 sale) या नावाने सेलची घोषणा केली.

ॲमेझॉनने इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू होण्याची तारीख जाहीर केली. पण तो किती दिवस असणार आहे. याबाबत अजून माहिती दिलेली नाही. पण ग्राहकांना वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर चांगलीच सवलत दिली जाणार आहे, असे दिसून येते. खरेदीदारांना ॲमेझॉनच्या पहिल्या खरेदीवर 10 टक्के कॅशबॅकसुद्धा (10 % Cashback) दिला जाणार आहे.

Amazon Great Indian Festival Sale मध्ये खरेदी करताय मग तुम्हाला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.

Amazon Great Indian Festival Sale 2022
Image Source : https://www.amazon.in/

मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी हा सेल म्हणजे सुवर्णसंधी ठरू शकते. कारण इथे वनपल्स, सॅमसंग, शिओमी आणि आयक्यू यासारख्या ब्रॅण्डेड मोबाईल कंपन्यांच्या स्मार्टफोनवर 40 टक्के सूट मिळू शकते.

  • कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे नुकतेच लॉन्च झालेले आणि नव्याने बाजारात येणारे स्मार्टफोन जसे की, Redmi 11 Prime 5G, iQoo Z6 Lite 5G, iPhone 14 हे सुद्धा या सेलमध्ये उपलब्ध असणार आहेत.
  • ॲमेझॉन लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन्स आणि अशाच प्रकारच्या अॅक्सेसिरीजवर 75 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
  • याशिवाय खरेदीदारांना फेस्टिव्हल सेलच्या काळात प्रत्येक 6 तासानंतर वेगवेगळ्या प्रॉडक्टसवर ऑफर मिळणार आहे.
  • एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना या फेस्टिव्हलमध्ये 10 टक्क्यांची विशेष ऑफर मिळणार आहे.