• 03 Oct, 2022 22:36

Amazon Freedom Festival : 6 ऑगस्टपासून सुरू; जाणून घ्या ऑफर्स आणि डील्स!

Amazon Freedom Festival 2022

Amazon Great Freedom Festival Sale 2022: अ‍ॅमेझॉनचा 6 ऑगस्टपासून फेस्टिव्हल सेल सुरू होत असून तो 10 ऑगस्टपर्यंत (Amazon Sale date) असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 40 ते 80 टक्क्यांची सवलत मिळणार आहे.

इंग्रजी कॅलेंडरमधील ऑगस्ट महिना आणि मराठी दिनदर्शिकेतील श्रावण महिना सुरू झाला की, वेगवेगळ्या उत्सवांची तयारी सुरू होते. अशावेळी शॉपिंग होणार नाही हे शक्यच नाही. हीच संधी साधून अ‍ॅमेझॉन आपल्या ग्राहकांसाठी विशेष Festival Sale घेऊन आला आहे. या ऑनलाईन शॉपिंग फेस्टिव्हलमधून ग्राहकांना अनेक ऑफर्स मिळणार असून यातून त्यांची बचत ही होणार आहे.

अ‍ॅमेझॉनचा हा फेस्टिव्हल सेल 6 ऑगस्टपासून सुरू होणार असून तो 10 ऑगस्टपर्यंत (Amazon Sale 2022) सुरू राहणार आहे. या सेलसोबतच ग्राहकांना एसबीआय बॅंकेच्या (SBI BANK) डेबिट आणि क्रेडिट कार्डवर (Debit & Credit Card) अतिरिक्त 10 टक्क्यांची सूट मिळणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच प्रोडक्ट्सवर नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI)चा लाभ घेता येणार आहे. अ‍ॅमेझॉन युपीआयचा (Amazon UPI) वापर करूनही ग्राहकांना आणखी सूट मिळवता येणार आहे. त्यामुळे हा अ‍ॅमेझॉनचा हा फेस्टिव्हल सेल खरेदीसाठी पर्वणीच ठरणार आहे.

मोबाईल आणि इतर गॅझेटवर 40 टक्क्यांची सूट!

अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमध्ये तुम्ही जर मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. कारण मोबाईल आणि इतर गॅझेटवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. यामध्ये तुम्ही मोबाईल, चार्जर, स्क्रीन गार्ड आणि इतर अ‍ॅक्सेसरीजवर चांगली भरघोस सूट मिळणार आहे. मोबाईलच्या काही अ‍ॅक्सेसरीजची किंमत तर 69 रूपयांपासून सुरू आहेत. जे तुम्ही तुमच्या बजेटनुसार आणि उपयुक्ततेनुसार विकत घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला नो कॉस्ट ईएमआय (No Cost EMI), एक्सचेंज ऑफरसुद्धा मिळणार आहे. याशिवाय टॉपच्या ब्रॅण्डेड मोबाईल कंपन्यांवर कूपन मिळणार आहेत.

लॅपटॉपच्या खरेदीवर 30 टक्के सवलत!

Amazon Laptop Sale August 2022

फ्रिडम फेस्टिव्हल सेल ऑफरमध्ये लॅपटॉपच्या खरेदीवर 30 टक्के सूट मिळू शकते. याशिवाय लॅपटॉपच्या खरेदीवर 25 हजार रूपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 18,990 रूपयांपासून लॅपटॉप मिळू शकतात. तर हेडफोनवर 75 टक्के आणि स्पीकरवर 65 टक्क्यांची सवलत मिळू शकते. मेमरी कार्ड आणि पेन ड्राईव्हवर 50 टक्के तर स्मार्टवॉचवर 75 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. याचबरोबर अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकरवर 70 टक्क्यांची सूट मिळणार आहे.

ऑफर्स ऑन फॅशन

सणासुदीच्या निमित्ताने या सेलमधून वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल कपडे अत्यंत कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. विविध प्रकारच्या कपड्यांवर 80 टक्के सूट दिली जाणार आहे. तर सौंदर्यप्रसाधने आणि मेकअपच्या सामानावर 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

अवघ्या महिन्याभरावर आलेला गणेशोत्सव आणि पुढील महिन्यात येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉनचा फेस्टिव्हल सेल सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.