Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या नियमातील बदलांना आरबीआयकडून मुदतवाढ

क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या नियमातील बदलांना आरबीआयकडून मुदतवाढ

आरबीआयने (RBI) 21 जून रोजी जारी केलेल्या निवेदनात 1 जुलै 2022 हे नवीन नियम लागू करण्याची मुदत दिली होती. हि मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली असून हे नियम आता 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.

 बँका आणि NBFC (Non-Banking Financial company) यांच्या डेबिट तसंच क्रेडिट कार्ड संबंधीच्या काही नियमांत येत्या 1 जुलैपासून बदल होणार होते. मात्र, आता या बदलांची मुदत भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank of India  RBI) तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. ही मुदत आता 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत असणार आहे. याबाबतची माहित आरबीआयने (RBI) निवेदनातून दिली आहे. 

1 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ 

1 जुलैपासून लागू होणार्‍या नियमांमध्ये ग्राहकाच्या संमतीशिवाय क्रेडिट मर्यादा न वाढवणे आणि ग्राहकाने महिनाभर क्रेडिट कार्ड सक्रिय न केल्यास ते बंद करण्याचाही समावेश होता. आरबीआयने (RBI) 21 जून रोजी जारी केलेल्या निवेदनात 1 जुलै 2022 हे नवीन नियम लागू करण्याची मुदत दिली होती. हि मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली असून हे नियम आता 1 जुलैऐवजी 1 ऑक्टोबरपासून लागू होतील असं म्हटले आहे. उद्योगाशी संबंधित सर्व भागधारकांचे म्हणणे ऐकून आणि त्यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती आरबीआयने आपल्या निवेदनातून प्रकाशित केली आहे.  

क्रेडिट कार्ड संबंधीचे नवीन नियम

रिझर्व्ह बँकेच्या मास्टर डायरेक्शननुसार, एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्ड जारी केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत ते अ‍ॅक्टिव्ह केले नाही, तर कार्ड जारी करणारी बँक ही संबंधित कार्डधारकाकडून OTP (One Time Password) द्वारे ते कार्ड अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी मंजुरी घेऊ शकणार आहे. समजा, क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक ही, त्या कार्डधारकाकडून कोणतीही मान्यता मिळाली नाही तर, हे क्रेडिट कार्ड पुढील सात कामकाजाच्या दिवसांत कोणतेही शुल्क न आकारता रद्द करू शकणार आहे.