Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Layoff चा अमेझॉनला असाही फटका, शेअरमध्ये घसरण, 5 हजार कोटींचे जेफ बेझोस यांचे नुकसान

Layoff

ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने बुधवारी सांगितले होते की, आर्थिक कारणामुळे त्यांच्या 18,000 कर्मचार्‍यांना Layoff ला सामोरे जावे लागेल. यानंतर एकाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.

ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने  बुधवारी सांगितले होते की, आर्थिक कारणामुळे त्यांच्या 18,000 कर्मचार्‍यांना Layoff  ला सामोरे जावे लागेल. यानंतर एकाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.

कंपनीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर हजारो कर्मचार्‍यांना काढून टाकल्याची घोषणा केल्यानंतर संस्थापक जेफ बेझोस यांच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आहे. एका दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये सुमारे 1 टक्क्यांची घसरण झाली आहे. म्हणजेच कंपनीच्या संस्थापकाने एका दिवसात 600 दशलक्ष डॉलर  पेक्षा जास्त म्हणजेच 5 हजार 539 कोटी रुपयांची संपत्ती गमावली आहे.  ई-कॉमर्स कंपनीने बुधवारी सांगितले होते की, uncertain economy मुळे 18,000 कर्मचार्‍यांना Layoff ला सामोरे जावे लागेल.

अॅमेझॉनच्या समभागांच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे संस्थापक बेझोस यांच्या निव्वळ संपत्तीवरही परिणाम झाला आहे, ज्यांनी एकाच दिवसात 600 दशलक्ष डॉलर्स किंवा भारतीय रुपयात विचार करायचा झाल्यास  5 हजार 539 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार बुधवारच्या अखेरीस बेझोस यांच्या  संपत्तीत 675 दशलक्ष डॉलरची घट झाली आहे.

अब्जाधीश जेफ बेझोस यांची सध्या 108 अब्ज डॉलरची संपत्ती आहे आणि ते जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, भारतीय उद्योगपती आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी अॅमेझॉनच्या बेझोसला मागे टाकले होते, जे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. उल्लेखनीय म्हणजे, अलीकडच्या काही महिन्यांत बेझोस श्रीमंतांच्या यादीत अनेक ठिकाणी घसरले आहेत.

Amazon ने 18000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

आयटी दिग्गज Amazon ने गुरुवारी सांगितले की ते 18,000 हून अधिक जणांना नोकर्‍यातून  काढून टाकणार आहेत. खर्च कमी करण्यासाठी कंपनी हे पाऊल उचलत आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी यांनी कर्मचाऱ्यांना  म्हटले आहे की, 18 जानेवारीपासून संबंधित कर्मचाऱ्याना सूचित केले जाईल.

ही कपात फर्मच्या अंदाजे 3 लाख  कॉर्पोरेट कर्मचार्‍यांपैकी 6% आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये झालेल्या 10,000 Layoff पेक्षा हा आकडा 80 टक्के अधिक आहे. सध्याच्या मंदीच्या काळात, Amazon ने 18,000 कर्मचार्‍यांना काढून टाकणे ही आतापर्यंतची सर्वात मोठी Layoff  असेल. सप्टेंबरच्या अखेरीस 1.5 दशलक्षाहून अधिक कर्मचारी अॅमेझॉनशी संबंधित होते.