Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Akasa Air : अकासा एअरलाईनमधून पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यास परवानगी;15 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू!

Akasa Air : अकासा एअरलाईनमधून पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यास परवानगी;15 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू!

अकासा एअरलाईन कंपनीची विमान वाहतूक सेवा 2022 मध्ये ऑगस्टपासून सुरू झाली. कंपनीकडे सध्या 6 विमाने असून मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या ताफ्यात 18 विमानं आणण्याची कंपनीची योजना आहे.

Akasa Air : नुकतीच सुरू झालेली अकासा एअरलाईन कंपनी प्राणी प्रेमींसाठी एक चांगली बातमी घेऊन आली आहे. अकासा एअरलाईन कंपनीने प्रवाशांना आपल्यासोबत पाळीव प्राण्यांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे. ही सोय लवकरच म्हणजे 15 ऑक्टोबरपासून याचे बुकिंग सुरू होणार असून प्राण्यांना घेऊन जाणारे विमान 1 नोव्हेंबरपासून उड्डाण करणार आहे.

विमानातून प्राण्यांना घेऊन जाण्याची सोय एअर इंडिया, जेट एअरवेज, स्पाईसजेट आणि विस्तारा या कंपन्यांनी यापूर्वीच सुरू केली आहे. त्यात आता अकासा एअरलाईनची सुद्धा भर पडली आहे. अकासा एअरलाईनमधून 1 नोव्हेंबरपासून प्राण्यांना सोबत घेत प्रवास करता येणार आहे. तर इंडिगो आणि एअरएशिया या कंपन्यांचे याबाबतीतील नियम वेगवेगळे आहेत.

Akasa ची 60 दिवसांत समाधानकारक कामगिरी

अकासा एअरलाईन कंपनीची विमान वाहतूक सेवा 2022 मध्ये ऑगस्टपासून सुरू झाली. कंपनीकडे सध्या 6 विमाने असून मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या ताफ्यात 18 विमानं आणण्याची कंपनीची योजना आहे. कंपनीने 72 बोईंग-737 मॅक्स विमानांची ऑर्डरसुद्धा दिली आहे. या 60 दिवसांत कंपनीची कामगिरी समाधानकारक आहे. तसेच आता लवकरच प्रवाशांना पाळीव प्राणी (कुत्रा, मांजर इत्यादी) सोबत घेऊन प्रवास करता येणार आहे, अशी प्रतिक्रिया अकासा एअरलाईन्सचे सीईओ विनय दुबे यांनी दिली.

अहमदाबाद-बंगळुरू दरम्यान अतिरिक्त फेऱ्या!

अकासा एअर कंपनी 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत 9 मार्गांवरून दर आठवड्याला 250 उड्डाणे पार करेल. दरम्यान, अकासा एअरलाइन्स दिल्ली मार्गावरसुद्धा सेवा सुरू करणार आहे. तसेच 7 ऑक्टोबरपासून अहमदाबाद-बंगळुरू मार्गावर दररोज अतिरिक्त विमानसेवा सुरू केली जाणार आहे.

‘अकासा’मध्ये राकेश झुनझुनवालांची गुंतवणूक!

शेअर मार्केटमधील बिग बूल गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पाठिंब्याने अकासा विमान कंपनीने 7 ऑगस्टपासून मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर विमानसेवा सुरू झाली होती. त्यानंतर आता चेन्नई, कोची, मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद या मार्गावर अकासाची विमानसेवा सुरू आहे. दरम्यान 14 ऑगस्ट, 2022 रोजी राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले होते.

Image Source : Twitter.com