• 05 Jun, 2023 20:06

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Airtel data plan : एअरटेलचा ग्राहकांना धक्का, जास्त डेटासाठी द्यावे लागणार जास्तीचे पैसे

Airtel data plan : एअरटेलचा ग्राहकांना धक्का, जास्त डेटासाठी द्यावे लागणार जास्तीचे पैसे

Airtel data plan : एअरटेलनं आपल्या ग्राहकांना धक्का दिलाय. डेटासाठीचे पॅकेज दर वाढवल्यानं आता ग्राहकांना अतिरिक्त डेटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार आहे. भारतातले डेटा पॅकचे दर प्रति जीबीच्या आधारावर जगात सर्वात कमी आहेत. त्यामुळे मूल्यांकन हे एक आव्हान आहे.

भारती एअरटेल (Bharti Airtel) ही एक देशातली टेलिकॉम कंपनी आहे. 5G सेवादेखील कंपनीनं सुरू केलीय. आता ग्राहकांच्या प्रतिसादाची कंपनीला प्रतीक्षा आहे. मात्र मूल्यांकन करणं एक आव्हान असल्याचं भारती एअरटेल कंपनीचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल (Gopal Vittal) म्हणाले. सध्या ग्राहकांना जास्त डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र त्यांनी भारतीय दूरसंचार उद्योगाच्या मूल्यांकन संरचनेतल्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. यासंबंधीचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलंय.

मागच्या वर्षी सुरू केली 5G सेवा

एअरटेलने मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 5G सेवा सुरू केली. आर्थिक वर्ष 2024च्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात सुमारे 50 टक्के वाढ नोंदवण्यात आलीय. कंपनीनं आर्थिक वर्ष 2023च्या चौथ्या तिमाहीत 3,006 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय. तर मागच्या वर्षीच्या याच कालावधीत तो 2,008 कोटी रुपये होता.

डेटा वापरात वाढ

एअरटेलसह विविध कंपन्या 5G सेवा देत आहेत. सध्या 5G सेवा 3,000हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. एअरटेल कंपनी वर्षाच्या अखेरीस सर्व प्रमुख शहरांमध्ये या सेवेचा विस्तार करेल, अशी अपेक्षा आहे. यासंबंधी विट्टल म्हणाले, की 5G सेवा सुरू केल्यानं डेटा वापरात वाढ होताना दिसत आहे. यामुळे प्रति ग्राहक सरासरी कमाईला फायदा होणार आहे. कारण 5G रेडी हँडसेटची संख्या सध्याच्या 10-11 टक्क्यांवरून सतत वाढताना दिसत आहे. दुसरीकडे डेटा पॅकसाठी भारतातला प्रति जीबी दर जगात सर्वात कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक डेटा मागणी होतेय, असं त्यांनी सांगितलं.

कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत

सध्या कंपनीची आर्थिक स्थिती चांगली आहे. आपला खर्च आणि कर्ज सेवेची गरज पूर्ण करण्यासाठी पुरेशी रोकड निर्माण करण्याची क्षमतादेखील कंपनीकडे आहे. खर्च नियंत्रणावर कंपनी लक्ष देत आहे. त्यामुळे कंपनीला खर्च कमी करण्यासही मदत होतेय. नेटवर्क, विक्री संबंधित खर्च कमी करणं आणि सर्व 4G क्षमता गुंतवणूक काढून टाकणं या बाबी आम्ही समाविष्ट केल्याचं ते म्हणाले.

अनलिमिटेड प्लॅन केले होते लॉन्च

कंपनीनं आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी काही प्लॅन्स लॉन्च केले होते. हे अनलिमिटेड प्लॅन असल्याचं कंपनीनं सांगितलं होते. यात 239 रुपयांपासून पुढच्या रिचार्जवर काही लाभ मिळणार असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. यात वायफाय कॉलिंगसह ओटीटीचं सबस्क्रिप्शन, इंटरनॅशनल रोमिंग अशा काही सेवांचा समावेश होता. कंपनीचा बजेट किंवा बेसिक प्लान 155 रुपयांपासून सुरू होतो. यात 1 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंग तसंच फ्री हॅलोट्यून्स अशा सुविधा दिल्या जातात. व्हॅलिडिटी 24 दिवसांसाठी आहे.

इतर कंपन्यांचे प्लान काय?

भारती एअरटेलचे मुख्य स्पर्धक रिलायन्स जिओ आणि व्ही म्हणजेच व्होडाफोड-आयडिया आहेत. यांच्या प्लान्सवर नजर टाकल्यास एअरटेलचे ग्राहक वाढलेले दर देणार का, असा प्रश्न निर्माण झालाय. जिओचा बेसिक प्लान 155 रुपयांना आहे. मात्र यात जिओच्या फास्ट नेटवर्कसह 2 जीबी डेटा आणि 28 दिवसांसाठी व्हॅलिडिटी आहे. तर व्होडाफोन-आयडियाचा प्लान 149 रुपयांना असून केवळ 1 जीबी डेटा 21 दिवसांच्या कालावधीसाठी मिळतो. यात कॉलिंग अनलिमिटेड असली तरी इतर कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. 99चा एक बेसिक प्लान असून 200 एमबी इंटरनेटसह 99चा टॉकटाइम 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळते.