Airtel 5G Data Pack: भारतामध्ये 5G इंटरनेट सेवेचे जाळे वाढत आहे. यामध्ये रिलायन्स ग्रुपची जिओ कंपनी आघाडीवर आहे. मात्र, जिओ कंपनीला टक्कर देण्यासाठी एअरटेल कंपनीही प्रयत्न करत आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड 5G इंटरनेट प्लॅन आणला आहे. त्यामुळे आता इंटरनेट डेटा संपण्याची चिंता दूर झाली आहे. प्रिपेड आणि पोस्टपेड प्लॅनवरील डेटाची मर्यादा एअरटेलने हटवली आहे.
239 रुपयांपुढील प्लॅनवर अनलिमिटेड डेटा(Airtel 5G plan)
ज्या पोस्टपेड आणि प्रिपेड ग्राहकांकडे 239 रुपयांपुढील इंटरनेट प्लॅन असेल अशा सर्व ग्राहकांना या ऑफरचा फायदा घेता येईल, असे एअरटेलने म्हटले आहे. जिओचे ग्राहक खेचून घेण्यासाठी एअरटेलकडून आकर्षक 5G ऑफर लाँच करण्यात येत आहेत.
दरम्यान, जिओ कंपनीने पोस्टपेड फॅमिली आणि वैयक्तिक प्लॅन्सवर अनलिमिटेड 5G डेटा देण्याची ऑफर आणली आहे. यामध्ये वायफाय कॉलिंग, ओटीटी सब्स्क्रिप्शन, इंटरनॅशनल रोमिंग यासारख्या सुविधा आहेत. average revenue per user (ARPU) वाढवण्यासाठी जिओकडून पोस्टपेड प्लॅनवर खास ऑफर देण्यात येत आहे. तसेच एअरटेल कंपनीकडील पोस्टपेड ग्राहक जिओ कंपनीकडे वळवण्यासाठी रिलायन्सचे प्रयत्न सुरू आहेत.
एअरटेलने 5G Pluse ही सेवा ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी मोठे जाहिरात अभियानही सुरू केले आहे. 2022 च्या शेवटी जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी देशभरात 5G सेवा देण्यास सुरुवात केला. 5G सेवा पुरवण्यामध्ये एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांमध्येच स्पर्धा असून व्होडाफोनने 5G सेवा अद्याप सुरू केली नाही. भारतीय बाजारामध्ये जिओ कंपनीची मोबाईल नेटवर्कमध्ये मक्तेदारी असून एअरटेल कंपनी या स्पर्धेमध्ये मागे आहे. भारतात 4G इंटरनेट सेवा वाढीचा वेग खूप जास्त होता. त्या तुलनेने 5G सेवेला ग्राहक प्रतिसाद देणार नाहीत, असे Crisil या रेटिंग संस्थेने म्हटले आहे.
मोबाईल नेटवर्क कंपन्यांमधील स्पर्धा
जिओ कंपनीकडून भारतामध्ये वेगाने 5G सेवेचे जाळे उभारले आहे. त्या तुलनेने एअरलेट कंपनी मागे आहे. जिओ कंपनीने भारतात सर्वप्रथम मोफत 4G इंटरनेट देऊन ग्राहकांना आकर्षित केले. मोफत इंटरनेटची ऑफर ग्राहकांना दिल्यानंतर एअरटेल आणि व्होडाफोनचे ग्राहक जिओकडे वळाले. त्यानंतर भारतीय बाजारात जिओ कंपनीची मक्तेदारी निर्माण झाली असून एअरटेल आणि व्होडाफोन मागे पडल्या आहेत. एअरटेल कंपनीला मागील काही दिवसांपूर्वी बाजारातून पैसे उभे करण्यात अडचण आली होती.