Career Tips : शिक्षण घेत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे ध्येय हे शिक्षण घेऊन आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर घडवणे आहे. प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या क्षेत्रात आवड असते पण काही वेळा त्याबाबत माहिती नसल्याने मिळेल त्या कोर्सला प्रवेश घेतला जातो. तिथेच निर्णय चुकतो आणि मग आयुष्यभर त्याच चुकीच्या निर्णयामुळे अपयश येतं. तुम्हाला जर कम्प्युटर कोर्समधून मिळणाऱ्या नोकरीमध्ये आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी. तुम्हाला वेब डिझाइन सारख्या क्षेत्रात आवड असेल तुम्ही त्यात आपले करिअर करू शकता. जाणून घ्या डिटेल्स
Table of contents [Show]
वेब डिझायनिंग
नोकरीसाठी सर्वात चांगला कम्प्युटर कोर्स म्हणजे वेब डिझायनिंग कोर्स आहे. वेब डिझायनिंग कोर्समध्ये JavaScript, PHP, HTML इत्यादी कोडिंग भाषांचा अभ्यास समाविष्ट आहे. सध्या या कोर्सला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. प्रोफेशनल वेब डिझायनिंग कोर्स 1 वर्षाचा आहे परंतु अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस 3 ते 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्ण करू शकता.
टॅली कोर्स
टॅली हे एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे, तुम्ही कोणत्याही संस्थेतून टॅली शिकू शकता आणि ते ऑनलाइन साइट्सवर देखील उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमादरम्यान हिशेब आणि आकडेमोड कशी सांभाळायची हे शिकवले जाते. टॅली हा देखील सर्वोत्तम ऑनलाइन कम्प्युटर कोर्स आहे. टॅली कोर्स 3 ते 4 महिन्यांचा आहे. यातून तुम्हाला चांगल्या पगारची नोकरी मिळेल.
हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्स
हार्डवेअर आणि नेटवर्किंग कोर्सला नेहमीच मागणी असते. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला आयटी क्षेत्रात उच्च पगाराचे पॅकेज सहज मिळू शकते. मोठ्या संस्था आणि महाविद्यालये हे कोर्स घेतात. या कोर्सनंतर नोकरीची गॅरंटी घेतल्या जाते.
IT डिप्लोमा
IT डिप्लोमा हा देखील 12वी नंतरचा सर्वोत्तम कम्प्युटर कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी जास्त आहे. हा कोर्स तुमच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकतो आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कॉम्प्युटरमध्ये मास्टर बनू शकता. डिप्लोमा इन आयटी कोर्सचा कालावधी 3 वर्षाचा आहे.
डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स
डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स हार्डवेअर, सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स आणि प्रोग्रामिंग कोर्स यासारख्या विषयांचा समावेश होतो. अनेक नामांकित महाविद्यालये आणि संस्था हा कम्प्युटर सायन्स कोर्स देतात. कम्प्युटर शास्त्राचा पदविका अभ्यासक्रम केल्यानंतर करिअरच्या भरपूर संधी आहेत. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पगारावर नोकरी मिळाली आहे. हा कोर्स 3 वर्षाचा आहे.
Source : www.abplive.com