Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Closing Bell : मोठ्या घसरणीसह शुक्रवारी बाजार बंद, अदानींची श्रीमंती आता चौथ्या नाही तर सातव्या क्रमांकावर

Sensex Closing Bell

Sensex Closing Bell: शुक्रवारच्या व्यापार सत्रानंतर सेन्सेक्स 874 अंकांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. 50 शेअर्सचा निफ्टी निर्देशांक 287 अंकांच्या घसरणीसह 17604 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी 1286 अंकांच्या घसरणीसह 40361 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

आठवड्यातील शेवटचा दिवस शुक्रवार देशांतर्गत शेअर बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. यादरम्यान सेन्सेक्समध्ये 874 अंकांची मोठी घसरण नोंदवण्यात आली. 50 शेअर्सचा निफ्टी निर्देशांक 287 अंकांच्या घसरणीसह 17604 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी 1286 अंकांच्या घसरणीसह 40361 अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, या काळात गुंतवणूकदारांचे सुमारे 6.5 लाख कोटी रुपये बुडाले. गेल्या दोन दिवसांच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने 1648 अंकांची घसरण नोंदवली आहे.

इंडिया  VIX 18%  वाढला

हिंडेनबर्गच्या अहवालाच्या प्रभावामुळे अदानी समूहातील समभाग घसरण्याचा कल शुक्रवारीही कायम राहिला. त्यामुळे दलाल स्ट्रीटमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुसरीकडे भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प आणि यूएस फेड बैठकीच्या निकालानंतर पहिल्या आठवड्यात इंडिया VIX 18% वर पोहोचला. शुक्रवारी बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 6.6 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे मानले जात आहे. BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 269.9 लाख कोटींवर आले आहे.

बँकिंग क्षेत्रातील समभागांना फटका 

बाजारातील घसरणीचा फटका बँकिंग क्षेत्रातील समभागांना सहन करावा लागला. निफ्टी बँकेत तो सुमारे 3.1 टक्क्यांनी कमजोर झाला. तो 1300 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. गेल्या अनेक महिन्यांत चमकदार कामगिरी करणाऱ्या PSU बँकेचे शेअर 7% पर्यंत घसरले. अदानी समूहाबाबतच्या खुलाशांचा बँकिंग क्षेत्रातील समभागांवर काय परिणाम होईल, अशी चिंता गुंतवणूकदारांना सतावू लागली आहे. जागतिक बाजारातील वाढीच्या तुलनेत शुक्रवारी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. वॉल स्ट्रीट आणि आशियाई बाजारांसह जागतिक बाजार या काळात नऊ महिन्यांच्या उच्चांकावर बंद झाले.अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 18.5% पर्यंत घसरले.  समूहाचे सर्व दहा समभाग घसरले. 

हिंडेनबर्गने जारी केलेल्या अहवालाचा समूहाच्या शेअर्सवर विपरीत परिणाम झाला. समूहाचे सर्व दहा समभाग शुक्रवारी घसरणीसह बंद झाले. फोर्ब्सच्या रिअलटाइम इंडेक्सनुसार समूह प्रमुख गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या वरून सातव्या स्थानावर घसरले आहेत. शुक्रवारी, अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 18.5% घसरले आणि 2762.15 रुपयांवर बंद झाले. याशिवाय अदानी टोटल गॅसचे शेअर्स 20% पर्यंत घसरले. लोअर सर्किटमध्ये अदानी पॉवरचे शेअर्स 5%, अदानी विल्मरचे शेअर 5% आणि NDTV चे शेअर 4.99% ने घसरले.