Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

अदानी आणि इस्राइलचे पंतप्रधान येणार एकाच मंचावर, Haifa चा आनंदोत्सव

Haifa

Gautam Adani : अदानी सध्या आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे. Adani Group मधील कंपन्यांचे शेअर्सची गेले 2-3 दिवस मोठी घसरण होत आहेत. मात्र Haifa बंदर ताब्यात घेतल्याचा आनंदोत्सव अदानी साजरा करणार आहेत. ते इस्रायलच्या पंतप्रधानासोबत स्टेज शेअर करणार आहेत.

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू मंगळवारी अदानी समूहाच्या इस्रायलमध्ये आयोजित समारंभाला उपस्थित राहणार आहेत. समूहाने Haifa  बंदर ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर हा कार्यक्रम होणार आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) आणि इस्रायलच्या गॅडोट ग्रुपने गेल्या वर्षी जुलैमध्ये बंदराच्या खाजगीकरणासाठी बोली लावली होती. कंसोर्टियमने हैफा बंदराच्या खाजगीकरणासाठी USD 1.18 बिलियन टेंडर जिंकले.

यावर्षी 11 जानेवारी रोजी खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर बंदराच्या अपग्रेडेशनचे काम जोरात सुरू आहे. कन्सोर्टियममध्ये भारतीय भागीदारांची 70 टक्के भागीदारी आहे तर स्थानिक भागीदारांची 30 टक्के हिस्सेदारी आहे.अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे मंगळवारी इस्रायलच्या उत्तर किनारी शहरातील हैफा पोर्ट टेम्पररी क्रूझ टर्मिनल येथे होणाऱ्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नेतन्याहूही उपस्थित राहणार आहेत.

इस्रायल गॅडॉट ग्रुप टेन फाउंडेशन आणि एलबीएच ग्रुपद्वारे नियंत्रित आहे आणि त्याची स्थापना 63 वर्षांपूर्वी झाली होती. समूहाचा इस्रायल, जर्मनी, नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये व्यापक व्यवसाय आहे आणि उद्योग क्षेत्रांसाठी आणि वैयक्तिक वापरासाठी रसायने, तेल आणि बियाणे यांचे वितरण आणि लॉजिस्टिकमध्ये आघाडीवर आहे.हैफा बंदर हे इस्रायलचे शिपिंग कंटेनर्सच्या बाबतीत दुसरे सर्वात मोठे बंदर आहे आणि पर्यटक क्रूझ जहाजांच्या शिपिंगच्या बाबतीत सर्वात मोठे बंदर आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सामान्य मालवाहू आणि कार हाताळण्याच्या स्पेक्ट्रममध्ये पुढील काही वर्षांत लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे आणि यामुळे कंपनीचे लक्ष आणि गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.