मुंबईत लोकलच्या माध्यमातून रोज मोठ्या संख्येने प्रवास केला जातो. यातून रेल्वेला उत्पन्नही चांगले मिळते. मात्र यात तिकीट न काढता फिरणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वेला मोठे नुकसान होत असते. रेलवेकडून एसी (वतानूकुलित) लोकलची सुविधा मिळाल्यानंतर सेकंड क्लासचे तिकीट असताना एसीतून प्रवास करत असल्याचे आढळून येऊ लागले. वर्षभरात अशा प्रकारे प्रवास करताना 20 हजारपेक्षा जास्त प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेवर वातानूकुलीत लोकलच्या (AC) सध्या रोज 56 फेऱ्या yया CSMT ते ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा या दरम्यान होतात. सध्या या लोकलमधून दररोज जवळपास 3 लाख नागरिक प्रवास करतात. एप्रिलमध्ये एसी लोकलमधून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही सुमारे 50 हजार इतकी होती. मे महिन्यापासून तिकीट दरात कपात करण्यात आल्यानंतर प्रवासी संख्येत वाढ़ होऊ लागली. मात्र या प्रवाशांव्यतिरिक्त विना तिकीट किंवा जनरल लोकलचे तिकीट किंवा अगदी जनरल पासवरही एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्याची संख्या अधिक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सकाळच्या आणि सायंकाळच्या काही एसी लोकल फेऱ्यांना गर्दी होताना दिसते. यामुळे अधिकचे पैसे मोजून एसी लोकलचे तिकीट किंवा पास काढून प्रवास करणाऱ्यांनाही गर्दीला सामोरे जावे लागते. काही वेळा ही गर्दी टाळण्यासाठीच एसीचा पर्याय स्वीकारला जातो. मात्र, त्यांचा हा हेतू यामुळे साध्य होताना दिसत नाही.
मध्य रेल्वेकडून कारवाई (Railway Fine )
यामुळे सकाळ आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत एसी तिकीट काढणाऱ्यांना बसायलाही मिळत नाही, असे आढळून आले. यामुळे एसीचे तिकीट नसताना प्रवास करणाऱ्यांवर मध्य रेल्वेकडून तिकीट चेकर्सच्या मदतीने विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही विना तिकीट प्रवाशांच्या संख्येत घट झालेली नाही, असे दिसून येत आहे. तिकीट चेकरच्या अपुऱ्या संख्येमुळे एसी लोकलमध्ये तिकीट चेकर नेमता येत नाही. त्यामुळे ही समस्या अधिक जाणवते आहे.
Railway Fine मधून 'इतकी' झाली दंड वसूली
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत एसी लोकलचे तिकीट नसणाऱ्या प्रवाशांवर केलेल्या कारवाईत मध्य रेल्वेने 38 लाख 79 हजार रुपये दंडाची वसुली केली आहे. या कालावधीत 20 हजार 104 प्रवाशांवर मध्ये रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे.
डिसेंबरमध्येही मध्य रेल्वेकडून होणारी कारवाई आणखी तीव्र झाली असल्याचेही सांगण्यात आले आहे.