Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Summer Season: उन्हाळा सुरू होताच कुलिंग प्रॉडक्ट्स, सॉफ्ट ड्रिंकच्या किंमतीत 7-25% वाढ!

Summer

Image Source : www.skyaircon.com

वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर एलजीने (LG Company) तीन शिफ्टमध्ये काम सुरू केले आहे. गोदरेज अप्लायन्सेस (Godrej Appliances) आणि पॅनासोनिक (Panasonic) सारख्या कंपन्या देखील एसी-फ्रिजचे (Air Conditioner and Fridge) उत्पादन 100% वाढवत आहेत. शीतपेये, दुधाचे पेय, पाणी, आईस्क्रीम यांचीही अधिक विक्री सुरू झाली आहे.

या महिन्यात एसी-फ्रिजच्या विक्रीत 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. शीतपेये (Cold Drink), दुधाचे पेय (Milk Drink), पाणी (Water), आईस्क्रीम (Ice Cream) यांचीही अधिक विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे महिनाभरातच त्यांच्या किमती 7-25% वाढल्या आहेत. येत्या काही महिन्यांत विक्री आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांनी उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे.

खरे तर, देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात दिवसाचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पॅसिफिक महासागरात उष्ण हवेचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 'एल निनो' इफेक्ट भारतात जाणवणार आहे. यामुळे भारतीय उपखंडाचे तापमान वाढणार असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. सहसा इतकी मोठी तापमानवाढ फेब्रुवारीमध्ये जाणवत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांची मागणी वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर एलजीने (LG Company) तीन शिफ्टमध्ये काम सुरू केले आहे. गोदरेज अप्लायन्सेस  (Godrej Appliances) आणि पॅनासोनिक (Panasonic) सारख्या कंपन्या देखील एसी-फ्रिजचे (Air Conditioner and Fridge) उत्पादन 100% वाढवत आहेत.

या कंपन्या पुरवठा वाढविण्याच्या तयारीत आहेत

पेप्सिको (Pepsico) : जगभरातील पेप्सीकोची सर्वात मोठी फ्रँचायझी वरुण बेव्हरेजेसने गेल्या वर्षी डिसेंबरपासून इन्व्हेंटरी वाढवण्यास सुरुवात केली आहे. भारतात, कंपनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दोन नवीन प्लांट्सची स्थापना करत आहे, तसेच 6 विद्यमान प्लांट्सची क्षमता वाढवत आहे.

एलजी इंडिया (LG India): LG India चे वरिष्ठ महाव्यवस्थापक कुलभूषण भारद्वाज म्हणाले, "महागाई असूनही, ल वस्तूंची मागणी कमी झालेली नाही. दरम्यान, उन्हाळा लवकर सुरू झाल्याने विक्रीत 10% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली आहे.

गोदरेज अप्लायन्सेस (Godrej Appliances) : बिझनेस हेड आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले, "गेल्या वर्षीच्या तुलनेत या उन्हाळ्यात सर्व कूलिंग उपकरणांची विक्री सुमारे 40% वाढेल असा आमचा अंदाज आहे."

पॅनासोनिक (Panasonic): पॅनासोनिक इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक बफुमियासु फुजिमोरी (Fumiyasu Fujimori)  यांच्या मते, एप्रिल 2022 पासून AC आणि फ्रीज सारख्या उत्पादनांच्या विक्रीत 35% वाढ झाली आहे. जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसतसा त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

एफएमसीजी (FMCG) कंपन्यांनीही आता त्यांचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. एसी-फ्रिजसारख्या वस्तूंबरोबरच एफएमसीजी उत्पादनांचे उत्पादनही वाढवले ​​जात आहे. कन्सल्टन्सी फर्म रेडसीरच्या विश्लेषकांनी एका अहवालामध्ये म्हटले आहे की, "काही उन्हाळ्यातील वापराच्या उत्पादनांची 2023 मध्ये जोरदार विक्री होण्याची अपेक्षा आहे." हा अहवाल  हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले, ITC आणि स्पेन्सर्स रिटेल या कंपन्यांच्या विक्रीच्या आकडेवारीवर आधारित आहे.