5G Best Plan: आयटी, टेक्नॉलॉजी, ई-कॉमर्स कंपन्या आणि टेलिकॉम सेक्टर या तिमाहीत जास्तीत जास्त नोकऱ्या देतील. एकूण नवीन रोजगारांपैकी 65 टक्के रोजगार 5G टेक्नॉलॉजीमुळे निर्माण होणार आहेत. आगामी काळात 5G मुळे फक्त डेटा स्पीड वाढणार नाही तर नोकऱ्या मिळवण्याचा वेग देखील वाढणार आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या विस्तारासोबतच तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी नवीन भरतीला वेग देण्याची योजना आखली असून, येत्या काळात तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात अशी माहिती मिळाली आहे.
स्टाफिंग कंपनी टीमलीजच्या अहवालानुसार
स्टाफिंग कंपनी टीमलीजच्या अहवालानुसार, टेलिकॉम क्षेत्रातील (Telecom sector) 90 टक्के कंपन्या डिसेंबरच्या तिमाहीत रोजगार उपलब्ध करून देण्याच्या योजनेवर काम करत आहेत. अहवालानुसार, कंपन्या 5G मुळे डिसेंबर तिमाहीत नोकरी-संबंधित क्रियाकलापांमध्ये 250 दशलक्ष खर्च करण्याच्या योजनेवर काम करत आहेत. दुसरीकडे, जर आपण अहवाल पाहिला तर दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या आक्रमक भरतीचे मुख्य कारण म्हणजे या क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकऱ्या बदलण्याचा वेगवान दर हे देखील आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत नोकरीतील बदलाचा दर गेल्या 6 तिमाहीत सर्वाधिक आहे. या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होण्याचे प्रमाण 10 टक्क्यांच्या वर आहे, जे जूनच्या तिमाहीत 9 टक्क्यांपेक्षा कमी होते. या अहवालात म्हटले आहे की, नोकरी गमावण्याचे प्रमाण जास्त असल्याने नवीन नोकऱ्यांची संख्या वाढली आहे.
सर्वाधिक नोकऱ्या मिळतील या सेक्टरमध्ये
डिसेंबर तिमाहीत नवीन नोकऱ्या देण्याच्या बाबतीत आयटी क्षेत्र आघाडीवर आहे. शैक्षणिक क्षेत्रातील ९५ टक्के आणि ई-कॉमर्स (E-commerce) क्षेत्रातील ९२ टक्के कंपन्यांनी नवीन नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. टीम लीजनुसार टेलिकॉम सेक्टर चौथ्या क्रमांकावर आहे. टेलिकॉम सेक्टरमध्ये सेल्स, इन्स्टॉलेशन, वायरिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअर, क्लाउड, डिझाइन, डेटा, एआय आणि मशीन लर्निंगशी संबंधित नोकऱ्या पाहायला मिळतील.