Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5G Launch: आपल्या जीवनावर काय परिणाम होणार?

5G LAUNCH

5g launch in India : देशात 5G सेवा सुरू करून, पंतप्रधान मोदींनी देशाची तांत्रिक प्रगती जलद मार्गावर आणली आहे. एकदा जर आपल्या जीवनात 5G नेटवर्क आले, की मग आयुष्य आता आहे त्यापेक्षाही सहज आणि सुलभ होईल. कारण 4G पेक्षा 5G 20 पटीने गतिशील आहे.

5g launch in India: 5G सेवा आपल्या दैनंदिन जीवनात ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हर्च्युअल इंटेलिजन्सचा परिचय करून देतील. खूप वर्षाच्या प्रतीक्षा केल्यानंतर अखेर भारतात 5G सेवा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इंडियन मोबाईल काँग्रेस 2022 ची सुरुवात करून देशात 5G सेवा सुरू केली आहे. यासोबत देशातील अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे.  1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडियन मोबाईल काँग्रेसला सुरुवात झाली आहे. हा उपक्रम 4 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. (India mobile congress 2022)


5G स्पेक्ट्रम म्हणजे काय?

1G, 2G, 3G आणि 4G म्हणजेच मुलगा, बाबा, आजोबा, पंजोबा आपल्या कुटुंबातील जशा अनेक पिढ्या निर्माण होतात आणि प्रत्येक समोरची पिढी ही आधीच्या पिढी पेक्षा विचाराने आणि प्रत्येकच बाबतीत पुढारलेली असते. 5G ही स्पेक्ट्रमच्या सातत्यपूर्ण सेल्युलर नेटवर्कमधील 5वी पिढी आहे. 5G हे 4G पेक्षा 20 पट अधिक स्पीड देते. (5G network speed) हे Wi-Fi वर जलद गतीने कार्य करते. कनेक्ट होण्याकरिता वेळ कमी लागेल. उदाहरण म्हणून, तुम्ही 2 तासांचा चित्रपट 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत डाउनलोड करू शकाल. हे 4G पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीवर कार्य करते आणि काही शंभर मीटर अंतरावर असलेल्या शू-बॉक्स आकाराच्या टॉवर्सच्या दाट पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. 

5G service Launch

औषधांमध्ये 5G चा वापर

आता तुम्हाला डॉक्टरला जाऊन भेटण्याची गरज नाही. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या दुखण्यातील भागाला कॅप्चर करून डॉक्टर पर्यन्त पोहचतील. तुम्हाला कुठेही औषध उपलब्ध होईल. ज्या वेगाने 5G काम करते त्यामुळे डॉक्टरांना शेकडो मैल दूर उपकरणे नियंत्रित करून दूरस्थपणे शस्त्रक्रिया करता येतील.

शिक्षणात 5G चा वापर

5G मध्ये शिक्षण परस्परसंवादी आणि मनोरंजक बनवण्याची क्षमता आहे. शिक्षक आता व्हर्च्युअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी टूल्स वापरून वर्ग घेऊ शकतील. यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.

5G आपल्या शहरांचा कायापालट कसा करू शकतो?

आपल्या शहरांना स्मार्ट शहरांमध्ये बदलण्यात 5G महत्त्वाची भूमिका बजावेल. सेंट्रलाइज्ड सिस्टीमशी जोडलेले सेन्सर ट्रॅफिक, स्ट्रीट लाइटिंग आणि इतर अनेक गोष्टी व्यवस्थापित करण्यात मदत करतील. (5G cities in India)

Internet History in India A Timeline

उद्योगांमध्ये 5G ची भूमिका (Industry)

5G चा औद्योगिक आणि व्यावसायिक क्रियाकलापांवर मोठा परिणाम होईल. हे स्मार्टली इन्व्हेंटरीज आणि लॉजिस्टिक ट्रॅक करण्यास परवानगी देईल.

5G आणि शेती (Farm)

पिकांचे रोग ओळखण्यासाठी, कीटकनाशकांच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांमध्ये 5G तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

चालकविरहित गाड्या (Driverless car) 

संशोधन अहवालानुसार जवळपास 95 टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. यामुळे ड्रायव्हरलेस कारच्या बाजूने युक्तिवाद खूप मजबूत होतो. पण त्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी ड्रायव्हरलेस गाड्या पूर्णपणे स्वायत्त बनवायला हव्यात. कारला त्यांच्या सभोवतालच्या कार, ट्रॅफिक लाइट आणि रस्त्याच्या चिन्हांशी संवाद साधण्याची आवश्यकता असेल.

Image Source : https://bit.ly/3dZB7o6