Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचायं, मग ही माहिती खास तुमच्यासाठी!

नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचायं, मग ही माहिती खास तुमच्यासाठी!

भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळ्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

Budget 5G Smartphone: तुम्ही तुमचा स्मार्टफोन बदलायचा विचार करताय, पण बजेट कमी आहे. काही चिंता करू नका. आम्ही तुमच्यासाठी तुमच्या बजेटला सूट होईल अशा काही नवीन 5G स्मार्टफोनची यादी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. स्मार्टफोन बदलणारच असाल तर भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळ्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

सहसा नवीन तंत्रज्ञान मार्केटमध्ये आलं की, त्याला जास्त डिमांड असतं आणि सुरूवातीला त्याची किंमत ही अधिक असते. पण 5G सेवा आणि 5G मोबाईल याला यावेळी अपवाद ठरलेत. कारण काही कंपन्यांनी सर्वसामान्यांना परवडेल असे 5G मोबाईल बाजारात आणले आहेत. आज आपण जे 5G स्मार्टफोन पाहणार आहोत; त्याची किंमत तुमच्या बजेटला परवडेल अशी म्हणजे 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स पाहुया.


OPPO A74 5G

ओपो कंपनीच्या A74 5G मोबाईलची स्क्रीन 6.5 इंच असून, 90 Hz अडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. यात 6 GB रॅम आहे. आणि याची बॅटरी 5000 mAh बॅटरी दिली आहे. कॅमेरा 48 MP+2MP+2MP आणि फ्रंट कॅमेरा 8 MP आहे.याची इंटर्नल मेमरी 128 GB असून ती 256 GBपर्यंत वाढवता येते. यात फ्ल्युईड ब्लॅक आणि फन्टॅस्टिक पर्पल हे दोन रंग उपलब्ध आहेत. याची किंमत 14,990 रूपये आहे.

iQOO Z6 5G

iQOO Z6 5G हा फोन खूपच स्लिम आणि स्टायलिश डिझाइनसह बाजारात आला आहे. यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर 2 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. तर फ्रंट साईटला 16 मेगापिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. यात 4 GB RAM असून स्टोरेज कपॅसिटी 128GB आहे. याची किंमत 14,999 रूपये आहे. 

Tecno Spark 8T

Tecno Spark 8T या 5G स्मार्टफोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे. स्टोरेज वाढवता येऊ शकतो. फोनची बॅटरी 5000 mAh असून याची किंमत फक्त 8,999 रूपये आहे. याला 50 मेगापिक्सल प्रायमरी आणि आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे आणि याची डिस्प्ले 6.6 इंच आहे.

Redmi Note 10T 5G

Xiaomi Redmi Note 10T 5G च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 11,999 रुपये आहे. Xiaomi Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये फुल एचडी रिझोल्यूशनसह 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 90 Hz अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर फोनमध्ये 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Poco M3 Pro 5G

Poco M3 Pro मध्ये अनेक अफलातून फीचर्स आहेत. यामुळे तुमचा या फोनबाबतचा अनुभव अधिक चांगला बनू शकेल. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्याते आले आहे. याची किंमत 13,999 इतकी आहे.