• 28 Nov, 2022 18:18

Apple मध्ये 5G सुविधा सुरू; एअरटेल आणि जिओ युजर्स कसे 5G Activate करू शकतात जाणून घ्या!

Apple iOS 16 Beta

Apple iOS 16 Beta Version: भारतात Airtel आणि Jio या दोन्ही कंपन्यांनी 5G सेवा काही निवडक शहरात सुरू केली. त्यासोबतच Apple iPhone युजर्ससाठी iOS 16.2 चा पब्लिक बीटा रोल आऊट झाला आहे. या अपडेटमुळे आयफोन युजर्सना भारतात Airtel आणि Jio 5G साठी सपोर्ट मिळणार आहे.

भारतात एअरटेल आणि जिओ (AirTel & Jio) या दोन्ही कंपन्यांनी 5G सेवा काही निवडक शहरात सुरू केली. त्यासोबतच ॲप्पल आयफोन (Apple iPhone) युजर्ससाठी iOS 16.2 चा पब्लिक बीटा रोल आउट झाला आहे. या अपडेटमुळे आयफोन युजर्सना भारतात एअरटेल  आणि जिओ  5G साठी सपोर्ट मिळणार आहे.  Apple iOS 16.2 बीटा साठी अपडेट डाउनलोड करण्यासाठी, युजर्सना  त्यांच्या iPhone च्या सेटिंग्जमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट (Software update) चेक करावे लागेल.  जर युजर्सने  बीटा प्रोग्रामसाठी नोंदणी केली असेल, तर त्यांना हे अपडेट मिळेल. इतर युजर्सना आता या अपडेटसाठी वाट बघावी लागेल. 

कोणते फोन 5G ला सपोर्ट करतात?

Apple च्या iPhone 12 Series, iPhone 13 Series, iPhone 14 Series तसेच iPhone SE (2022) मध्ये 5G नेटवर्क सपोर्ट उपलब्ध आहे. पब्लिक बीटा iOS 16.2 डाउनलोड केल्यानंतर यामध्ये Airtel आणि Jio चे 5G सिग्नल दिसतील. मात्र, जेथे 5G सेवा सुरू आहे. तिथेच सिग्नल (signal) दिसतील. 


आयफोनवर 5G कसे सक्रिय करावे

  • सर्वात आधी फोनमधील अपडेट डाऊनलोड करा. 
  • नंतर तुमचा फोन रिस्टार्ट (Restart) करा. 
  • तुम्हाला फक्त तुमची 5G सेटिंग्ज सेट करायची आहे.
  • सेटिंगमध्ये जाऊन मोबाईल डेटा वर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील, 4G , 5G आणि 5G ऑटो.
  • तुम्ही यापैकी 5G नेटवर्कवर स्विच करणे किंवा "ऑटो" मोड सक्रिय करणे निवडू शकता.
  • तुमचा फोन 5G ऑन किंवा 5G ऑटो वर स्विच झाल्यावर आपोआप जवळच्या 5G नेटवर्कशी कनेक्ट होईल.
  • एकदा तुम्ही या सर्व स्टेप पूर्ण केल्या की, तुमचा iPhone 5G स्पीड घेईल.