Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST Council Meet: ऑनलाइन गेमिंगवर 28% GST; तर कर्करोगावरील औषध स्वस्त

GST

ऑनलाइन गेमिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला. तसेच यापुढे घोड्यांची शर्यत आणि कसिनोवर 28% GST आकारण्यात येईल. मल्टिप्लेक्समधील फूड आणि शीतपेयवरील कर 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आणण्यात आला. तसेच कर्करोग आणि काही दुर्मिळ आजारावरील औषधांना GST च्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना उपचार स्वस्त होणार आहेत.

GST Council Meet: दिल्लीमध्ये वस्तू आणि सेवा कर परिषदेची 50 वी बैठक काल मंगळवारी पार पडली. या बैठकीत जीएसटीबाबत महत्त्वाचे निर्णय झाले. ऑनलाइन गेमिंगवर 28% जीएसटी लागू करण्याच्या निर्णयावर बैठकीत एकमत झाले. तसेच यापुढे घोड्यांची शर्यत, कसिनोवर 28% GST आकारण्यात येईल. तसेच कर्करोगावरील उपचारासाठी आयात होणाऱ्या काही ठराविक औषधांवरील जीएसटी माफ केला आहे.

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का

ऑनलाइन गेमिंग क्षेत्र विस्तारत असताना आता या गेम्सवर 28% टक्के कर आकारला जाईल. सोबतच "गेम ऑफ स्किल्स आणि गेम ऑफ चान्स' या दोन्ही प्रकारामध्ये कोणताही फरक न करण्यावर बैठकीत एकमत झाले. जीएसटी परिषदेच्या मागील बैठकीत 18% कर लागू करण्याचा विचार सुरू होता. मात्र, त्यावर एकमत होऊ शकले नव्हते. मात्र, आता हा कर 28 टक्क्यांवर नेला आहे. या कराच्या भारामुळे गेमिंग इंडस्ट्रीवर मोठा परिणाम होणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

मल्टिप्लेक्समधल्या रेस्टॉरंटमधील फूड आणि पेयांवर 5% GST

मल्टिप्लेक्स/सिनेप्लेक्स रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ आणि पेयावर 5% जीएसटी आकारला जाईल. सोबतच तिकिटावरील करही कमी केला आहे. यापूर्वी 100 रुपयांखालील तिकीटावर 12 टक्के आणि त्यापुढील तिकिटावर 18% GST आकारला जात होता. मात्र, हा दर आता 5% करण्यात आला आहे. सोबतच न शिजवलेले अन्नपदार्थ, मासे यावरील जीएसटी आता 5% केला आहे.

कर्करोगावरील औषधांच्या आयातीवर सूट 

कर्करोगावरील औषध Dinutuximab वरील आयात कर माफ करण्यात आला आहे. सोबतच इतर काही दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या आयातीवरील कर माफ करण्यात आला आहे. पूर्वी अशा औषधांवर 12 टक्के जीएसटी होता.

कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील उपचार देशात महागडे आहेत. जीएसटी कमी केल्याने जनतेला नक्कीच फायदा होईल, असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, एसयूव्ही गाड्यांवरील GST सेस 20 टक्क्यांवरून 22% करण्यात आला आहे. यात सेदान श्रेणीतील गाड्यांचा समावेश नाही.