कोविड 19 नंतरच्या कालावधीमध्ये वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा समस्या यामुळे 2 वर्षांत वाहनांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोविड १९ नंतर वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली. कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यातील प्रश्नांमुळे येत्या 2 वर्षांमध्ये वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या जानेवारी 2023 पर्यंत वाहनांच्या किंमती आणखी वाढलेल्या बघायला मिळणार आहेत. किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय सर्वात आधी मारुति सुझुकीने जाहीर केला होता. त्यानंतर आता टाटा मोटर्स, किआ, रेनो, सिट्रोन, जीप, आॅडी, मर्सिडिज बेंन्झसारख्या कंपन्यांचाही यात समावेश होत गेला.
उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीमुळे वाहनांच्या किंमती वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. याशिवाय पुढील वर्षी 6 एअर बॅग्जचा नियमही अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मारुती कारच्या किंमतीत वाढ
मारुती कंपनीने याविषयी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ पासून त्यांच्या गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. कंपनीच्या विविध माॅडेल्सनुसार किंमतींमध्ये वाढ होणार आहे. यात सर्वाधिक खपाची आॅल्टो, आॅल्टो के 10, इग्निस, वॅगनार, सेलेरिओ, एस-प्रेसो, स्विफ्ट, इको, डिझायर, ब्रेझा, सियाज, अर्टिगा, एक्सएल 6 आणि ग्रँड विटाराचा समावेश आहे.
टाटाच्या या गाड्या महागणार
जानेवारीपासून टाटा आयसीई कार्स आणि इव्हींच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. उत्पादन खर्चात झालेली वाढीमुळे किंमत वाढवण्यात येत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.नेक्साॅन ईव्ही, टियागो इव्ही, टिगोर ईव्हींच्या किंमतींमधील वाढ ही प्रामुख्याने महाग ईव्ही बॅटरीमुळे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जानेवारी २०२३ पासून ह्युंदाई देखील गाड्यांच्या किंमतींमध्ये वाढ होणार आहे. कंपनीने किती टक्के दरवाढ करणार आहे,याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र वाढीव उत्पादन खर्चाचा भार ग्राहकांवर कमीतकमी टाकण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कंपनीने यापूर्वी म्हटले आहे.
याचबरोबर किआ कार खरेदी करणे dदेखील महाग होणार आहे. किआ वाहनांच्या किंमतींमध्ये 50 हजार रुपयांची वाढ केली जाणार आहे. कंपनीच्या सेल्टाॅस, सोनेट, कँरेस आणि कार्निव्हलच्या विविध व्हेरियंट्सनुसार किंमतीत वाढ केली जाणार आहे. किआने भारतीय बाजारपेठेत कमीवेळेत आपले स्थान भक्कम केले आहे. नोव्हेंबरमध्ये 6 लाख वाहनांची विक्री करण्यात आली होती.
कंपनीने प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे. यानुसार, रेनो क्विड, एमपीव्ही ट्राईबर, काॅम्पॅक्ट एसयुव्ही कायगर सारख्या माॅडेल्सच्या किंमती वाढवल्या जाणार आहे. मात्र, किती टक्के ही वाढ होणार आहे, माहिती कंपनीने दिलेली नाही.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2023 पासून वाहनांच्या किंमतींमध्ये 1.5 टक्का ते 2 टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. कंपनी भारतात सी ३ आणि सी ५ एअरक्राॅसची विक्री करते. अशा परिस्थितीत सी ३ एअरक्राॅससाठी 8 हजार 800 रुपये आणि सी 5 एअरक्राॅससाठी अतिरिक्त 16 हजार 300 रुपये मोजावे लागणार आहेत.