दिल्ली परिवहन महामंडळामध्ये (डीटीसी) टाटा मोटर्सच्या 1500 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. दिल्ली परिवहन महामंडळाने टाटा मोटर्ससोबत याविषयीचा करार केला आहे.
1500 इलेक्ट्रिक बससाठी हा करार असणार आहे. याबाबत एका निश्चित करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. कराराचा एक भाग म्हणून TML CV मोबिलिटी सोल्युशन्स 12 वर्षांसाठी 12 मीटरच्या लो-फ्लोअर एसी इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करेल. संचालन आणि देखभालही करणार आहे.
दिल्ली परिवहन महामंडळातील व्यवस्थापकीय संचालक शिल्पा शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, "आम्ही दिल्लीत 1 हजार 500 इलेक्ट्रिक बसेसच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ऑर्डरसाठी करारावर स्वाक्षरी करताना आनंद होत आहे. राजधानी शहरात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अवलंब करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्या म्हणाल्या. शून्य-उत्सर्जन, ध्वनी-मुक्त बसेसचा समावेश हे आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. शहराची हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही बाब महत्वाची ठरेल. नवीन बसेसचा त्यांच्या अत्याधुनिक सुविधा आणि आरामदायी आसनव्यवस्था यामुळेही प्रवाशांना खूप फायदेशीर ठरतील अस त्या म्हणाल्या.
TML CV Mobility Solutions Ltd चे अध्यक्ष असीम कुमार मुखोपाध्याय यांनी देखील यावर भाष्य केले. ते म्हणाले, “ ही खरोखरच आमच्यासाठी एक ऐतिहासिक अशी संधी आहे. कारण, आम्ही देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक बस ऑर्डरसाठी निश्चित करारावर स्वाक्षरी केलेली आहे. आमचे संबंध एक दशकाहून अधिक काळ मजबूत आहेत. परस्पर विश्वास आणि सहकार्याच्या पायावर आधारित आहेत आणि या करारामुळे हे अधिक मजबूत होईल. इलेक्ट्रिक बस दिल्लीच्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूकीचा अनुभव देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हे स्वदेशी बनावटीचे वाहन आहे. यातून प्रवाशांसाठी सहज आणि आरामदायी प्रवास तसेच कमी खर्चात चालण्याचे आश्वासन मिळते. आतापर्यंत कंपनीकडून भारतातील अनेक शहरांमध्ये 730 हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्यात आलेला आहे.