मुलींचे चांगले भविष्य आणि चांगले शिक्षण हे प्रत्येक पालकांचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) माध्यमातून पालकांनाही पाठिंबा देत आहे. या योजनेंतर्गत केवळ 2 दिवसात सुमारे 11 लाख खाती उघडली गेली आहेत. या वस्तुस्थितीवरुन या योजनेची लोकप्रियता लक्षात येऊ शकते. बचत योजनांबाबत भारतीय पोस्ट ऑफिसने (Indian Post Office) चालवलेल्या मोहिमेमध्ये हा विक्रम नोंदविला गेला आहे.
Table of contents [Show]
विशेष मोहिमेला यश
भारतीय पोस्टने गेल्या 8 वर्षात एकूण 2.7 कोटी खाती उघडली आहेत. 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत आझादी का अमृत महोत्सव आणि अमृतकाल की शुरुवात च्या निमित्ताने भारतीय पोस्टने 7.5 लाख सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Account Scheme) उघडण्याच्या उद्देशाने एक विशेष जागरूकता मोहीम सुरू केली होती. भारतीय पोस्टला त्यांनी घेतलेल्या या विशेष जागरूकता मोहिमेचा प्रचंड फायदा झाला. भारत पोस्टने देशाच्या वेगवेगळ्या भागात 2 दिवसात (9 आणि 10 फेब्रुवारी) 1 लाखाहून अधिक पोस्ट कार्यालयात एकूण 10,90,0000 सुकन्या समृद्धि खाती उघडण्यात आली आहेत.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट
केंद्रीय रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, "देशातील मुलींच्या भविष्यासाठी समर्पित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमृत भेट. भारतीय डाकने 2 दिवसात 10 लाखाहून अधिक सुकन्या समृद्धी खाती उघडली.''
पंतप्रधानांनी केले अभिनंदन
तप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Tweet) यांनी या कर्तृत्वासाठी पोस्ट ऑफिसचे ट्विट करुन त्यांचे अभिनंदन केले. सन 2015 मध्ये सुरू झालेल्या सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडली गेली आहेत. अधिक व्याज आणि कर सूटच्या फायद्यामुळे ही योजना प्रत्येक वर्गाद्वारे पसंत केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत 2 दिवसात उघडलेल्या 10.90 लाख खात्यांसाठी भारतीय पोस्ट ऑफिसचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले आणि ते म्हणाले, या मोठ्या कामगिरीबद्दल @IndiaPostOffice चे खूप-खूप अभिनंदन! हा प्रयत्न देशाच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करेल आणि त्यांना बळकट करेल.
योजनेचे वैशिष्ट्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 'बेटी बाचाओ, बेटी पढाओ' मोहिमेखाली 'सुकन्या समृद्धी योजना' सुरू केली. या योजनेंतर्गत पालक त्यांच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी खाते उघडू शकतात. योजनेंतर्गत आपल्या मुलीच्या खात्यात वर्षाकाठी 7.6 टक्के दराने व्याज मिळते. या व्यतिरिक्त, दर तीन महिन्यांनी व्याजाचे देखील पुनरावलोकन केले जाते. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सूट देखील मिळते.