Budget 2023 Update: आज सकाळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशात 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका(Elections) होणार असून येत्या निवडणुकीत शहरी लोकसंख्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे अर्थसंकल्पामध्ये शहरातील विकासासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील स्वच्छतेसाठी व शहरी भूमी उपयुक्त बनविण्यासाठी निधी व नियोजनावर भर देखील देण्यात आला आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.
शहरातील विकासासाठी 10,000 कोटींची तरतूद
या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी शहरी विकासासाठी 10,000 कोटींची तरतूद केली आहे. शहरातील स्वच्छतेसाठी व नागरी भूमी उपयुक्त बनविण्यासाठी निधी व नियोजनावर यावेळी भर देण्यात आला आहे. यासाठी देशातील सर्व नगरपालिका आत्मनिर्भर होणार आहेत. नॅशनल हाऊसिंग बँक(National Housing Bank) शहरी विकासासाठी मदत करेल असे यामध्ये सांगण्यात आले आहे. याशिवाय शहराच्या जमिनीचा नागरी विकासासाठी योग्य वापर केला जाईल. मालमत्ता कर आणि नगरविकास निधीतून शहरांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातील. शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेच्या माध्यमातून महानगरपालिका संस्थांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर्व शहरातील स्वच्छतागृहे आणि नाल्यांच्या साफसफाईसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. देशभरातील महानगरपालिका संस्थांचा कारभार अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावीपणे करणार येणार आहे. यासाठी केंद्राकडून राज्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.