भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. वेगवगळ्या संस्थांच्या पाहणी अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेला सकारात्मकरीत्या दर्शवले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे.
परकीय थेट गुंतवणुकीच्या (Foreign Direct Investment) बाबतीत भारताने उत्तम कामगिरी केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या (UNCTAD's) ताज्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार 2022 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. आशिया खंडातील विकसनशील देशांमध्ये भारताला गुंतवणूकदारांची मोठी पसंती मिळताना दिसते आहे असे या अहवालात म्हटले आहे. एकीकडे भारतात विदेशी गुंतवणूक वाढत असताना विकसित देशांमध्ये मात्र ही गुंतवणूक 37 टक्क्यांनी घटल्याचे सदर अहवालात म्हटले आहे.
India received USD 6044 Million in FDI equity inflow from the US in FY 2022-23.
— Invest India - USA (@InvestIndiaUSA) July 5, 2023
Discover #IndiaUSRelations ?: https://t.co/EXHtViyXRT#IndiaAndTheWorld #InvestIndia #InvestInIndia #USIndiaRelations @CGI_Atlanta @cgihou @IndiainNewYork @CGISFO @IndiainChicago @USAndKolkata pic.twitter.com/K8D8TZX4h9
49 अब्ज डॉलर्सची भारतात गुंतवणूक
जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारतीय अर्थव्यवस्था जोमात आहे. UNCTAD च्या अहवालानुसार, 2022 मध्ये भारताने थेट परकीय गुंतवणुकीच्या (FDI) बाबतीत सर्व देशांना मागे टाकले असून, देशातील FDI 10 टक्क्यांनी वाढून 49 अब्ज डॉलर्स इतकी नोंदवली गेली आहे. सरकारी पातळीवर देखील उद्योगधंदे वाढीसाठी वेगवगेळ्या योजना आणल्या जात आहेत. तसेच स्टार्टअप कंपन्यांना प्रोत्साहन दिले जात आहे, आर्थिक सहाय्य दिले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम आता जाणवू लागला आहे. अहवालानुसार भारत आता जागतिक स्तरावर नवीन प्रकल्पांची घोषणा करणारा जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश ठरला आहे. जवळपास 64% नवे आंतरराष्ट्रीय प्रकल्प भारतात आले आहेत.
पाच देशांमध्ये 80% FDI
संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या (UNCTAD's) अहवालानुसार गेल्या वर्षी 2022 मध्ये, सर्वाधिक परदेशीगुंतवणूक (FDI) मिळालेल्या पाच देशांमध्ये चीन, हाँगकाँग, सिंगापूर, भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या देशांचा समावेश आहे. जागतिक स्तरावर परकीय गुंतवणुकीची आकडेवारी बघता एकूण गुंतवणुकीच्या तब्बल 80% गुंतवणूक ही या पाच देशांमध्ये करण्यात आली आहे.
चीनला टाकले मागे
2022 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली असतानाच चीनमधील गुंतवणुकीची वाढ 5% नोंदवण्यात आली असून एकूण गुंतवणूक 189 अब्ज डॉलर इतकी नोंदवली गेली आहे. तसेच सिंगापूरमध्ये विदेशी गुंतवणूक 8 टक्क्यांनी वाढून 141 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, तर संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये ती 10 टक्क्यांनी वाढून 23 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.