How Zero Depreciation Car Policy Works : जर आपल्याला आपण नवीन घेतलेल्या वाहनाचा सर्वसमावेशक असा विमा मिळाला, तर अपघात झालेल्या आपल्या वाहनाची नुकसान भरपाई ती विमा कंपनी देते. सर्वसमावेशक विम्यामध्येच थर्ड पार्टी इन्शुरन्स देखील आधीच समाविष्ट असते. त्यामुळे केवळ आपल्याच वाहनाचे नुकसान झाले म्हणजे नुकसान भरपाई मिळते असे नाही तर, आपल्या वाहनामुळे इतर कुणाच्याही वाहनाचे नुकसान झाल्यास किंवा व्यक्ती अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास आपल्याला भरपाई मिळते हे निश्चित.
झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स म्हणजे काय?
अशा सर्वसमावेशक विमा पॉलिसीसह, इतरही अनेक प्रकारचे विमा संरक्षण आणि सुविधा ज्या एका पॉलिसी मध्ये असते. त्याला झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स म्हणतात. हा विमा आपले वाहन जुने झाल्यानंतरही विम्याची रक्कम कमी होऊ देत नाही. म्हणजेच काय तर आपल्या जुन्या वाहनाचा अपघातात झाल्यास समजा वाहनाचे नुकसान झाले, तरी देखील विम्याची संपूर्ण रक्कम दिली जाते.
समजा आपण दहा लाख रुपयांची कार घेतली. 6 महिन्यांनंतर ती कार दुसऱ्या वाहनाला धडकली आणि ती दुरुस्त करण्यासाठी 1,00,000 लाख रुपये खर्च आला. मग जर का आपल्याकडे सामान्य कारचा विमा आहे. आणि आपण आपला दावा विमा कंपनीकडे सादर केला. तर विमा कंपनी त्या दाव्याच्या बदल्यात 80,000 रुपये देणार आणि उर्वरित 20 हजार रुपये आपल्याला स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागेल. हेच जर का आपल्याकडे झिरो डिपॉझिट इन्शुरन्स असते तर आपला हा 20,000 रुपयांचा खर्च देखील वाचला असता.
कोणी विकत घ्यावे झिरो डेप इन्शुरन्स?
तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल, तर झिरो डेप इन्शुरन्स खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जर तुम्ही मोटार इन्शुरन्स पॉलिसी घेत असाल तर, लक्षात ठेवा की विमा पॉलिसीसोबत झिरो डेप कव्हर जोडल्यास प्रीमियम २० टक्क्यांनी वाढतो. आणि झिरो डेप इन्शुरन्स फक्त नवीन वाहन किंवा जास्तीत जास्त 3 वर्षे जुन्या कार साठीच मिळतो. जर तुमची कार चार वर्षे जुनी असेल, तर तुम्हाला फक्त सामान्य विमा पॉलिसी घ्यावी लागेल. त्यासाठीच आधीच म्हणजे कार नवीन घेतांनाच झिरो डेप इन्शुरन्स खरेदी करावे.
झिरो डेप इन्शुरन्सचे फायदे काय आहे ?
जर का गाडीचे झिरो डेप इन्शुरन्स असेल तर, यामुळे खिशातून होणारा खर्च जवळजवळ शून्यावर आणण्यास मदत होते. म्हणजेच कुठलाही-कश्याही प्राकारचा आपघात झाल्यास, झिरो डेप इन्शुरन्स आपल्या वाहनाच्या कुठल्याही भागाची किंमत कमी न करता संपूर्ण भरपाई देते. इन्शुरन्स आपल्या खिशातुन होणाऱ्या आर्थिक खर्चाचे संरक्षण करते. तसेच कारचे भाग बदलण्यास आणि दुरुस्तीकरीता संपूर्ण नुकसान भरपाई देते.