Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Youtube New Ad Policy: आता युट्युबच्या जाहिराती स्किप करता येणार नाहीत, जाणून घ्या यूट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शनचे दर

Youtube New Ad Policy

Google ने YouTube च्या जाहिरात धोरणात काही नवे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ग्राहकांना इच्छा नसतानाही लांबलचक जाहिराती बघाव्या लागणार आहेत. आता जसा 'स्कीप' हा ऑप्शन जाहिराती न बघण्यासाठी दिला जातो, तसा आता दिला जाणार नाहीये.

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जमान्यात अजूनही युट्युबचे फॅन काही कमी नाहीत. तुम्ही देखील स्मार्ट टीव्हीवर यूट्यूब बघत असाल तर आतापासून मोठमोठ्या जाहिराती पाहण्यासाठी सज्ज व्हा.

खरे तर Google ने YouTube च्या  जाहिरात धोरणात काही नवे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ग्राहकांना इच्छा नसतानाही लांबलचक जाहिराती बघाव्या लागणार आहेत. आता जसा 'स्कीप' हा ऑप्शन जाहिराती न बघण्यासाठी दिला जातो, तसा आता दिला जाणार नाहीये.

स्मार्ट टीव्हीवर बघितल्या जाणार्‍या YouTube व्हिडियोमध्ये आता मोठमोठ्या जाहिराती दाखवण्यास सुरुवात केली जाणार आहे. सुरुवातीच्या काळात केवळ स्मार्ट टीव्हीवर हा नियम लागू केला जाईल.तसेच यापुढे YouTube व्हिडिओत 30 सेकंदांची जाहिरात देखील दाखवली जाणार आहे.
विशेष म्हणजे ही जाहिरात वगळण्याचा पर्यायही युजरला नसेल.

नवीन जाहिरात धोरणाची सुरुवात अमेरिकेतून होणार!

जाहिरातीचे हे नवे धोरण कंपनीने जाहीर केले असले तरी केव्हापासून हे धोरण लागू केले जाणार आहे याबद्दल स्पष्ट माहिती दिली नाहीये. तसेच स्मार्टफोन व्यतिरिक्त इतर प्लॅटफॉर्मवर हे धोरण राबवले जाईल किंवा नाही याबद्दल देखील गुगलने कोणतीही माहिती दिलेली नाही.व्यवसायाच्या दृष्टीने अमेरिकेत जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास गुगल भारतासह अन्य बाजारपेठांमध्येही हे जाहिरात धोरण राबवणार असल्याचे मानले जात आहे.

सध्या, YouTube एका व्हिडिओवर स्किप बटणासह 2 ते 15-सेकंदाच्या जाहिराती दाखवते. आता मात्र, व्हिडिओ आणि युट्युब ज्या प्लॅटफॉर्मवर बघणार आहे त्यानुसार जाहिरातही वेगळी असणार आहे.

एका ब्लॉग पोस्टमध्ये, Google ने YouTube च्या नवीन जाहिरात धोरणाची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की Google स्मार्ट टीव्हीवरील यूट्यूब व्हिडिओंमध्ये 'पॉज अॅड' ही संकल्पना देखील लागू करणार आहे. या फिचरमध्ये, व्हिडिओ पॉज केल्यावर, जाहिरात पॉप अप सुरू होईल आणि व्हिडिओ पुन्हा प्ले होईपर्यंत ते दिसत राहील. जेव्हा जाहिरात पॉप अप होईल, तेव्हा स्क्रीनवर पॉज असलेल्या व्हिडिओचा आकार लहान होईल.

YouTube Premium जाहिरात मुक्त

सध्या YouTube TV वरील लांबलचक जाहिराती वगळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे YouTube Premium चे सब्सक्रिप्शन घेणे हा होय.

वैयक्तिक वापरासाठी  YouTube Premium सबस्क्रिप्शनची किंमत भारतात 129 रुपये प्रति महिना, कुटुंबाच्या वापरासाठी (Family Usage) 189 रुपये प्रति महिना इतकी आहे. यात वय वर्षे 13 पेक्षा अधिक असलेल्या 5 जणांना युट्युब वापरता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील वेगळे प्रीमियम सबस्क्रिप्शन असून, 79 रुपये प्रति महिना त्याचे दर आहेत. प्रीमियमचे  सबस्क्रिप्शन घेणारे वापरकर्ते जाहिरातमुक्त व्हिडीओ यूट्यूबवर पाहू शकता